राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 18 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) 50 धावांनी धुव्वा उडवला आहे. राजस्थानने पंजाबला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावाच करता आल्या. राजस्थानने यासह पंजाबचा विजयी रथ रोखला. राजस्थानचा हा या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. संजू समॅसन (Sanju Samson) याच्या नेतृत्वात राजस्थानने ही कामगिरी केली.
पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, युद्धवीर सिंग चरक आणि संदीप शर्मा.