मोरगाव, ता. ५ : मोरगाव (ता. बारामती) केंद्रांतर्गत निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत मोरगाव, तरडोली, चांदगुडेवाडी, आंबी खुर्द, आंबी बुद्रुक या पाच गावांमध्ये गावठाण व वाड्यावत्यांवरील १६ शाळांवर चावडी वाचनाचा कार्यक्रम राबविल्याची माहिती केंद्रप्रमुख रवींद्र तावरे यांनी दिली.
मोरगाव केंद्रशाळा येथे सकाळी चावडी वाचन घेण्यात आले. अध्ययनस्तरात प्रगत असणाऱ्या मुलांचे वाचन घेतले. त्यांची प्रेरणा घेऊन इतर सर्व मुलांनी वाचन केले. विनायक हेरंब धारक या पालकांनी मुलांना बिस्कीट वाटले. केंद्रप्रमुख रवींद्र तावरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य व पालक उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापिका संगीता भापकर व शिक्षक अशोक कुतवळ, अनिल यादव, मनीषा रासकर, गोरख नवले, अरुणा खैरे, संगीता तावरे या शिक्षकांनी नियोजन केले होते.