मुंबई : भारतीय शेअर बाजारातून ऑक्टोबर 2024 पासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याची प्रक्रिया एप्रिल 2025 च्या पहिल्या चार दिवसात देखील सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रम्प टॅरिफमुळं सतर्क होत पैसे काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. एप्रिल महिन्यातील पहिल्या चार दिवसात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून 10355 कोटी रुपये काढून घेतले आहेत. डिपॉजिटरीच्या आकडेवारीनुसार 21 मार्च ते 28 मार्च या कालावधीत 6 दिवसांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 30927 कोटी रुपये गुंतवले होते. त्यामुळं त्यांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्याची आकडेवारी मार्च महिन्यात 3973 कोटी रुपयांनी घटली होती.
फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून 34574 कोटी रुपये काढून घेतले होते. जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेण्यात आले होते. एफपीआयकडून 78027 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करण्यात आली होती. पीटीआयनुसार, बीडीओ इंडियाचे पार्टनर आणि लीडर, एफएस टॅक्स अँड रेग्युलेटरी सर्व्हिसेसचे मनोज पुरोहित यांच्या मते येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्केट भागीदारांचं लक्ष अमेरिकेच्या टॅरिफच्या लाँग टर्म परिणाम आणि आरबीआयच्या येत्या आठवड्यातील पतधोरण समितीच्या बैठकीकडे राहील. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात येईल, अशी आशा आहे.
आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी 1 एप्रिल ते 4 एप्रिल पर्यंत भारतीय शेअर बाजारातून 10355 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1.27 लाख कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.डेट मार्केटच्या संदर्भातील आकडेवारीनुसार एफपीआयनं एप्रिलमध्ये बाँड आणि डेट मार्केट ते जनरल लिमिटपर्यंत 556 कोटी रुपयांपर्यंत आणि वॉलेंटरी रिटेन्शन रुट पर्यंत 4038 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
जिओजीत इन्वेस्टमेंटसचे चीफ इन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट वी.के. विजयकुमार, अमेरिकेनं लादलेले टॅरिफ अपेक्षेपेक्षा अधिक आहेत, आता त्याच्या व्यापक आर्थिक प्रभावामुळं चिंता निर्माण झाली आहे. भारत आणि इतर देशांवर लावलेल्या टॅरिफमुळं अमेरिकेत महागाई वाढणार आहे. यामुळं अमेरिकेच्या शेअर बाजारात विक्रीचं सत्र पाहायला मिळाली. एसअँडपी 500 आणि नॅस्डॅक 10 टक्के घसरण झाली आहे.
ट्रेड वॉरचा परिणाम दूरगामी होऊ शकतो. ज्यामुळं जागतिक व्यापार आणि आर्थिक वाढीवर परिणाम होईल. डॉलर इंडेक्स 102 वर येणं भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी भांडवली प्रवाहासंदर्भात अनुकूल राहू शकतो.
इतर बातम्या :
अधिक पाहा..