पिंपरी, ता. ५ : असोसिएशन ऑफ ट्रान्स्पोर्ट पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात नुकताच माथाडी कामगारांच्या पगारवाढीचा लेव्हीसह २३ टक्के करार झाला. हा करार जानेवारी २०२५ पासून लागू झाला आहे. पुढील तीन वर्षे हा करार कायम राहणार आहे.
निगडी येथील असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद आणि असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, उपाध्यक्ष सुमीत धुमाळ, सरचिटणीस अनुप जैन, खजिनदार सतनामसिंग संधू, कार्याध्यक्ष गौरव कदम, माजी अध्यक्ष तथा सदस्य प्रमोद भावसार, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक काळे, अध्यक्ष लीगल कमिटी तथा सहप्रतिनिधी दिल्ली अनिलकुमार शर्मा, विश्वस्त जगराम चौधरी, संजय बारसे, सह खजिनदार सुभाष शर्मा, सदस्य राजकुमार फडतरे, तेजस ढेरे, के. सी. शर्मा, के. पी. सिंग, आर. के. गुप्ता, विनोद जगजंपी, रोहतास चौधरी, सुनील कौशिक, नितीन जाधव, सुभाष धायल, रवींद्र शर्मा, प्रदीप नलावडे आणि महाराष्ट्र मजदूर संघटनेचे पदाधिकारी यांनी वेतन करारावर स्वाक्षरी केल्या.
असोसिएशन ऑफ ट्रान्स्पोर्ट पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यामधील जुना करार ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर नवीन करार करून असोसिएशन ऑफ ट्रान्स्पोर्ट पुणे यांनी माथाडी कामगारांच्या वेतनात भरीव वाढ केली आहे. करारावर स्वाक्षऱ्या होताच कामगारांनी गुलालाची उधळण करीत कराराचे स्वागत केले. अनिल शर्मा यांनी आभार मानले.