मुंबई : ‘‘राज्यातील एका रुग्णालयाने गर्भवतीला दाखल न केल्याने तिचा मृत्यू होतो. त्यावरून विरोध झालेल्या त्या आंदोलनाला ‘शो’ म्हटले जात असेल तर राज्याचा कारभार भंपकपणे सुरू असल्याचे लक्षात येते,’’ अशी टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला संघाचा आशीर्वाद असल्याने कारवाई होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.
नाशिक दौऱ्यावर आले असताना राऊत यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकर नाईक व मनोहर जोशी या मुख्यमंत्र्यांच्या उंचीपर्यंत पोहोचण्याआधी आताचे मुख्यमंत्री फडणवीस पायउतार होतील.