चाइम न्यूज: अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यातल्या रेल्वेच्या जागेत आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला लागून चक्क चोरी छुपी गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. अकोल्यातल्या एमआयडीसी पोलिसांना याचा सुगावा लागला असता त्यांनी थेट कारवाई करत हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
राज्यात गांजा लागवडीवर कायद्याने पूर्णतः बंदी आहे. मात्र, तरीही चोरी छुप्या पद्धतीनं गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अकोल्यातही गांजा लागवड केल्याचा प्रकार समोर आलाय. काही अज्ञातांनी अकोल्याच्या कृषी नगर परिसरातल्या रेल्वेच्या जागेत थेट गांजाची लागवड केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी या ठिकाणी कारवाईत संपूर्ण गांजाची झाडे उध्वस्त केलेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भिंतीला लागून आणि अकोला-नांदेड रेल्वे रुळाच्या जागेत या गांजाची लागवड करण्यात आली होती. एमआयडीसी पोलिसांची जवळपास 3 तास ही कारवाई सुरु होती.
अखेर, पोलिसांनी ही संपूर्ण गांजाची झाडे उखडून टाकली आहे. मात्र गांजा लागवड कुणी केलाय? याचा सुगावा अद्याप हाती लागला नाही. तरीही पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरुये. परंतु या कारवाईनंतर अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. ऐन अकोला शहरातल्या गजबजलेल्या वस्तीतील रेल्वे रुळाच्या जागेत गांजा लागवड होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होतायेत.
घातपात करण्याच्या इराद्यानं शस्त्रसाठा घरात लपवून ठेवणाऱ्या एकाला भंडाऱ्याच्या साकोली पोलिसांनी धारदार शस्त्रांसह अटक केली. पोलीस येताच दुसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या कारवाईत साकोली पोलिसांनी तलवार, चाकू, गुप्ती, कोयता, हॉकीस्टिक आणि काही दारूचा साठाही जप्त केला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून साकोली इथं प्रॉपर्टीच्या वादातून मोठा घातपात करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी गाठून ही कारवाई केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही कारवाई साकोलीच्या गणेश वार्ड इथं केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ओडिसा राज्यातील दिनेश अग्रवाल (४४) याचा समावेश असून अशोक अग्रवाल हा फरार झाला असून साकोली पोलीस त्याचा शोध घेत आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..