Harshvardhan Sapkal slams Agriculture Minister Manikrao Kokate for his statement about farmers
Marathi April 06, 2025 01:27 PM


कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही माणिकराव कोकाटे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

मुंबई : सध्या उन्हाळा सुरू आहे. पण अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. येणाऱ्या काळात अवकाळीचे ढग आणखी गडद होण्याची शक्यता आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा आणि केळी उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसलाय, तर काही ठिकाणी काढणी करून कापण्यासाठी ठेवलेला शेतातला कांदा अवकाळी पावसाच्या पाण्याने भिजलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास हजारो क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. अशावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही माणिकराव कोकाटे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. (Harshvardhan Sapkal slams Agriculture Minister Manikrao Kokate for his statement about farmers)

माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोकाटे यांनी असे वक्तव्य पहिल्यांदाच केलेलं नाही. त्यांनी यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल असेच विधान केले होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची तुलना त्यांनी भिकाऱ्यांशी केली होती. त्यानंतर आता त्यांनी कर्ज भरत नाहीत आणि साखरपुडा व लग्न करतात असे वक्तव्य केलं आहे. परंतु अशी वक्तव्य करणं कृषीमंत्र्यांना शोभत नाही. खरं तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करायला पाहिजे. परंतु लाडके मंत्री म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र दुसरीकडे सुनील केदार आणि राहुल गांधी यांच्यावर 24 तासांच्या आत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे हे सरकार विकृतांच्या पाठिशी असल्याचे दिसून येत असल्याची घणाघाती टीका सपकाळ यांनी महायुतीवर केली.

हेही वाचा – Aaditya Thackeray : एवढा हतबल मुख्यमंत्री पाहिला नाही; आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानाचा मी निषेध करतो. कारण सध्या शेतकऱ्यांवर असमानी संकट आहे. गारपीटीचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळावा म्हणून सरकारने कर्जमाफी केली पाहिजे. मात्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना दिलासा द्यायाला तयार नाही. या सरकारने आरोग्य मिशन गुंडळण्याचं काम सुरू केलं आहे, असा दावाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?

नाशिक दौऱ्यावर असताना एका शेतकऱ्यांना माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी होणार आहे का? असा प्रश्न विचारला होता. यावर माणिकराव कोकाटे चांगले संतापले. कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? सरकार आता तुम्हाला शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार. पण तोपर्यंत शेतकरी 5 ते 10 वर्ष वाट पाहतात आणि कर्ज भरत नाही. सरकार सिंचनासाठी, पाईपलाइनसाठी, पिकांसाठी, शेततळ्याला पैसे देणार आहे. भांडवली गुंतवणूक सरकार करतं, शेतकरी करतो का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे हवेत, याचे-त्याचे पैसे हवेत, पण पैसे दिल्यावर शेतकरी साखरपुडे आणि लग्न करातो, असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले.

हेही वाचा – Devendra Fadnavis : धर्मादाय व्यवस्था एका प्लॅटफॉर्मवर आणणार; भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर फडणवीसांची माहिती



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.