आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 एप्रिल 2025
esakal April 06, 2025 01:45 PM

पंचांग -

रविवार : चैत्र शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय दुपारी १.२१, चंद्रास्त उ. रात्री २.५३, श्रीराम नवमी, चैत्री नवरात्र समाप्ती, श्रीस्वामिनारायण जयंती, श्रीरामदास जयंती, भारतीय सौर चैत्र १६ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००२ - बहुचर्चित ‘लगान’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शनासह आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीचे (आयएएफए) सात पुरस्कार.

  • २००९ - राहुल द्रविडने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी टिम मॅकेन्टोश याचा झेल घेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १८२ झेल घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

  • २०१५ - माझगाव डॉक येथे ‘प्रोजेक्ट-७५’ अंतर्गत बांधणी सुरू असलेल्या सहा स्कॉर्पिन पाणबुड्यांपैकी पहिल्या पाणबुडीचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते जलावतरण.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.