Mugdha Chaphekar : भुला देना मुझे..., 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, ९ वर्षानंतर झाले वेगळे
Saam TV April 06, 2025 02:45 PM

सध्या मनोरंजनसृष्टीत अनेक जोडप्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहे. चाहत्यांच्या आवडत्या जोड्यांमध्ये दुरावा आलेला पाहायला मिळत आहे. अशीच एक बातमी आता समोर आली आहे. टिव्ही अभिनेत्रीचा नुकताच घटस्फोट झाला आहे. या अभिनेत्रीने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन केले आहे. तिच्या अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री आहे.

'कुमकुम भाग्य' या मालिकेमुळे अभिनेत्री चाफेकरला (Mugdha Chaphekar) खूप लोकप्रियता मिळाली. तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडतो. अखेर तिचा रविश देसाई (Ravish Desai) सोबत झाला आहे. याची माहिती रविश देसाईने सोशल मिडिया पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. मात्र मुग्धा चाफेकरने अद्यापही आपल्या घटस्फोटावर मौन बाळगले आहे.

रविश देसाई याने पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, मुग्धा आणि रविश खूप विचार करून विभक्त झाले आहेत. त्यांनी वेगळे मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी , मैत्री असा सुंदर प्रवास केला आहे आणि तो आयुष्यभर पुढे देखील राहील. त्यांनी चाहत्यांकडून आणि माध्यमांकडून पाठिंबा द्यावा अशी विनंती केली आहे. तसेच खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नक असे देखील सांगितले आहे.

लव्हस्टोरी काय?

मुग्धा चाफेकर आणि रविश देसाई यांची पहिली ओळख 'सतरंगी ससुराल' या मालिकेच्या सेटवर 2014 साली झाली. तेव्हा त्यांच्यात छान मैत्री सुरू झाली आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर 2016 मध्ये यांनी लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या 9 वर्षांनी मुग्धा चाफेकर आणि रविश देसाई विभक्त झाले आहेत. त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

रविश देसाई देखील एक उत्तम अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. रविश देसाई आणि मुग्धा चाफेकर यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.