'सिकंदर' (Sikandar) रिलीज होण्याआधी सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांमध्ये चित्रपटासाठी क्रेझ पाहायला मिळत होती. मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमाची कामगिरी निराशाजनक पाहायला मिळत आहे. 'सिकंदर' हा ॲक्शन ड्रामा आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर चाहत्यांना वेड लावले आहे. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. 'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास (A R Murugadoss ) यांनी केले आहे. 'सिकंदर' चित्रपटातून सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
खानचा 'सिकंदर' (Sikandar Box Office Collection) चित्रपट रिलीज होऊन आता सात दिवस पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट सात दिवसांत अजूनही १०० कोटींचा टप्पा पार करू शकला नाही आहे. '' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झपाट्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या दोन दिवशी बंपर कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर' चित्रपटाने आतापर्यंत किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.
पहिला दिवस- 26 कोटी
दुसरा दिवस - 29 कोटी
तिसरा दिवस - 19.5 कोटी
चौथा दिवस - 9.75 कोटी
पाचवा दिवस - 8.28
सहावा दिवस - 3.75 कोटी
सातवा दिवस - 3.28 कोटी
एकूण - 97.50 कोटी
आजपर्यंत 'सिकंदर' चित्रपटाने ईदच्या दिवशी भरपूर कमाई केली. 'सिकंदर' 30 मार्चला रिलीज झाला. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झपाट्याने घट होताना पाहायला मिळत आहे. भाईजानचा 'सिकंदर' अजूनही 100 कोटींचा टप्पा पार करू शकला नाही आहे. अद्याप 'सिकंदर'ने चित्रपटाचे बजेट वसूल केले नाही आहे.
सलमान आणि रश्मिकासोबत (Rashmika Mandanna) चित्रपटात काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर आणि सत्यराज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चित्रपटातील सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.