बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, ‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?
Marathi April 06, 2025 10:25 PM

बँक जॉब 2025: तुम्ही बँकिंग (Bank) क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इंडिया एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँकेने (EXIM बँक) मॅनेजमेंट ट्रेनी (MT) सह अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

इंडिया एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँकेने एकूण 28 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना EXIM बँकेच्या www.eximbankindia.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. EXIM बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 28 रिक्त पदे भरली जातील. यामध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या 22 पदांचा, उपव्यवस्थापकाच्या 5 पदांचा आणि मुख्य व्यवस्थापकाच्या 1 पदांचा समावेश आहे.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 22 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे आणि ती 15 एप्रिल 2025 पर्यंत चालणार आहे. तर, लेखी परीक्षा मे 2025 मध्ये घेतली जाऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी शुल्क 600 रुपये ठेवण्यात आले आहे. SC/ST/PwBD/EWS/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे.

कसा कराल अर्ज?

सर्व प्रथम EXIM बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.eximbankindia.in/careers वर जा. पोस्टच्या लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा. नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा. सर्व आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत हजारो पदांसाठी भरती होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.