आपटाळे, ता. ६ : काले (ता. जुन्नर) येथे श्रीराम जन्म सोहळा भाविकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला. जन्म सोहळ्याच्या क्षणी भाविकांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. देवजन्मा निमित्ताने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.
यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले केले होते. यानिमित्ताने सकाळी ७ ते ९ या वेळेत गावातील ग्रामदेवतांचे अभिषेक व मांडव डहाळे, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सुभाष महाराज खलाटे यांचे देव जन्माचे कीर्तन, दुपारी १ ते ४ या वेळेत संगीत भजन, दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत काशी आई देवी काठी मिरवणूक, सायंकाळी ६ वाजता दंडवते, महाप्रसाद, श्री सद्गुरू गोसावी बाबा महाराज काठी मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. यात्रा उत्सवानिमित्त दीपाली सुरेखा पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा पार पडला.
यावेळी मंदिराची आकर्षक सजावट नंदाराम पानसरे यांनी केली. यात्रा उत्सवासाठी मुंबई, पुणे स्थित ग्रामस्थ हजर होते. यात्रेचे नियोजन सरपंच कुलदीप नयकोडी, दौलत पानसरे, शशिकांत पानसरे, नारायण पानसरे, बबन गुंड, संजय कुमकर, बाळू पानसरे, सागर पानसरे, तानाजी पानसरे, रामदास पानसरे, दीपक चतुर, अविनाश पानसरे आदींनी केले.