गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील घराजवळ मोठी चोरी; चाेरटे घरात शिरले, रोकड घेऊन धूम प
Marathi April 14, 2025 12:27 AM

नागपूर:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या नागपूरच्या त्रिकोणी पार्क परिसरात मोठ्या चोरीची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री या परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. त्रिकोणी पार्क परिसरातील संबंधित कुटुंब काही कारणाने बंगरुळला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. त्यांनी संपूर्ण घरातील सामान, कपाटातील रोकड व दागिने चोरून नेल्याचं समोर आलं आहे. (Nagpur Crime)

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरचे निवासस्थान याच परिसरात असून इथे 24 तास पोलीस बंदोबस्त असतो. तरीही चोरट्यांनी एवढ्या  बंदोबस्तात  लाखोंचा माल लंपास करत फरार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चोरीची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, सीताबर्डी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्रिकोणी पार्कजवळील धरमपेठ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाच्या घराजवळील एका घरात ही चोरी झाली.घरमालक राजेंद्र श्रीधर घरपुते (64) हे 11 एप्रिल रोजी बेंगळुरूमध्ये असताना चोर घरात घुसला आणि 300 अमेरिकन डॉलर्स, दागिने आणि 1.25 लाख रुपयांची रोकड घेऊन पळून गेला.एकूण 1.75 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू परिसरातून चोरीला गेल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.शनिवारी चोरी उघडकीस आली आणि कलम 305(अ) आणि भारतीय न्याय संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये संतापजनक घटना

नाशिकमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे.  रिक्षा चालकाने भररस्त्यात नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून तो शहरातून तडीपार असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा:

Nashik Crime : नाशिकमध्ये भयंकर प्रकार, तडीपार गुंडाकडून धावत्या बसला रिक्षा आडवी घालत नग्न होऊन महिलेचा विनयभंग, बसच्या काचाही फोडल्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.