संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) शुक्रवारी गाझामधील अन्न पूर्णपणे संपल्याची माहिती दिली आहे. गेल्या सात आठवड्यांपासून सीमा पूर्णपणे बंद असल्याने गाझाच्या आत कोणतीही वस्तू किंवा मदत जाऊ शकत नाही. ज्यामुळे मुले कुपोषणाने त्रस्त आहेत. इस्रायलच्या दीर्घकाळ चाललेल्या नाकाबंदीमुळे गाझापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही माल शिल्लक राहिलेला नाही आणि मानवतावादी मदतही शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे गाझामधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे की, सीमा बंद होण्यापूर्वीच्या 42 दिवसांत 25,000 ट्रकने गाझामध्ये मदत पोहोचवली. तर WFP चे म्हणणे आहे की, सीमेवर अजूनही 1.16 लाख मेट्रिक टन अन्न अडकले आहे.
शेवटचे जेवण कम्युनिटी किचनला देण्यात आले
WFP ने सांगितले की त्यांनी त्यांचे शेवटचे जेवण कम्युनिटी किचनमध्ये पाठवले आहे. ही स्वयंपाकघरेही काही दिवसांत पूर्णपणे रिकामी होतील, असा इशारा एजन्सीने दिला आहे. इस्रायलच्या दीर्घकाळ चाललेल्या नाकाबंदीमुळे गाझापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही माल शिल्लक राहिलेला नाही आणि मानवतावादी मदतही शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे गाझामधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. डब्ल्यूएफपीने सांगितले की, गाझाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा लॉकडाऊन होता.
गाझामधील परिस्थिती किती वाईट आहे?
2 मार्चपासून इस्रायलने गाझाला सर्व प्रकारचा पुरवठा बंद केला आहे. WFP नुसार, त्यांनी चालवलेल्या 25 बेकरी बंद करण्यात आल्या आहेत. कारण गहू आणि इंधनाचा तुटवडा आहे. दोन आठवडे चालणारे अन्न आता पूर्णपणे संपले आहे.
मुलांसाठी एक वेळचे जेवणही मिळत नाही
उपासमार हा आता धोका नसून खरी शोकांतिका असल्याचे गाझाच्या हमास सरकारने म्हटले आहे. हजारो कुटुंबांना आपल्या मुलांसाठी एक वेळचे जेवणही मिळत नाही. उपासमार आणि कुपोषणामुळे 50 मुलांसह 52 जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज 10 लाखांहून अधिक मुले उपाशी राहतात.
इस्रायल काय म्हणाला?
इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी गाझामध्ये उपासमार झाल्याचा इन्कार केला आहे. हमासने मदत पुरवठा रोखल्याचा आरोप त्यांनी केला आहे, मात्र हमासने हा आरोप फेटाळून लावला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे की, सीमा बंद होण्यापूर्वीच्या 42 दिवसांत 25,000 ट्रकने गाझामध्ये मदत पोहोचवली. तर WFP चे म्हणणे आहे की, सीमेवर अजूनही 1.16 लाख मेट्रिक टन अन्न अडकले आहे. दरम्यान, ही परिस्थिती कधी पूर्वपदावर येते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.