इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमने-सामने येणार आहेत.
या दोन संघात होणारा सामना आयपीएलमधील हायव्होल्टेज सामन्यांपैकी एक समजला जातो.
गेली १८ वर्षात या दोन संघात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत.
आत्तापर्यंत आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात हे दोन संघ ३३ वेळा आमने-सामने आले आहेत.
या ३३ सामन्यांपैकी बंगळुरूने १४ वेळा विजय मिळवला आहे, तर मुंबईने १९ वेळा विजय मिळवला आहे.
या दोन संघात झालेल्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी तीन सामने बंगळुरूने जिंकले आहेत, तर दोन सामने मुंबईने जिंकले आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये एकमेकांसमोर येण्यापूर्वी मुंबईने ४ पैकी एकच सामना जिंकला आहे, तर बंगळुरूने ३ पैकी दोन सामने जिंकले आहेत.