Indian Idol 15 Winner: 'इंडियन आयडल 15' जिंकली, २५ लाख मिळाले, आता मानसी घोष काय करणार?
Saam TV April 07, 2025 03:45 PM

गाण्यांचा लोकप्रिय शो 'इंडियन आयडल 15' चा (Indian Idol 15) ग्रँड फिनाले 6 एप्रिलला पार पडला. 'इंडियन आयडल 15'ची ट्रॉफी कोलकाता येथे राहण्याऱ्या मानसी घोषने उचलली आहे. मानसीने वयाच्या 24 व्या वर्षी हे यश संपादन केले आहे. मानसी घोषने आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना कायमच मंत्रमुग्ध केले. सध्या मानसीवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा, कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. तिने 'इंडियन आयडल 15' पूर्ण प्रवासात सुपरहिट गाणी गायली आहे.

मानसी घोषला बक्षीस काय मिळाले?

मानसी घोषला (Manasi Ghosh Prize Money ) 'आयडल 15'ची ट्रॉफी आणि 25 रुपये बक्षीसाची रक्कम मिळाली आहे. 'इंडियन आयडल 15'च्या ट्रॉफीवर मानसी घोषने आपले नाव कोरले आहे. मानसीने आपल्या आवाजाने कायमच परीक्षकांचे मन जिंकले आहे.

मानसी घोष प्राईज मनीचे काय करणार?

घोषने सांगितले की, "मला मिळालेली प्राईज मनी मी इंडिपेंडेंट म्युझिकवर खर्च करणार आहे. तसेच मी नवीन गाडीवर उरलेली रक्कम खर्च करेल"

बॉलिवूडचे पहिलं गाणं

मानसी घोषचे लवकरच पहिले बॉलिवूड गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणे ललित पंडित आणि शान यांच्या सोबत आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. हे गाणे एका चित्रपटासाठी आहे.

टॉप-३ कोण?

मानसी घोषने विजेते पद पटकावले. तर शुभोजीत चक्रवर्ती फर्स्ट रनर अप ठरला आणि स्नेहा शंकर सेकंड रनर अप झाली. दोन्ही रनर अप विजेत्यांना 5 लाखांची प्राईज मनी मिळाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.