कमी खर्चात अधिक नफा, काळ्या मिरचीच्या लागवडीतून शेतकरी लखपती, सेंद्रिय शेतीतून आदर्श निर्माण
Marathi April 11, 2025 05:24 AM

यशोगाथा काळ्या मिरचीची लागवड: देशातील अनेक शेतकरी पारंपारिक शेती ऐवजी काहीतरी नवीन करत आहेत. यातून ते चांगला नफा मिळवत आहेत. मेघालयातील (Meghalaya ) नानादोरो बी. मार्क हा असाच एक शेतकरी आहे. जो 5 हेक्टर जमिनीवर काळी मिरची पिकवत (black pepper cultivation ) आहे. या शेतीतून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. सेंद्रिय पद्धतीने काळ्या मिरीची लागवड करतात. मार्कला शेतीसाठी पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.

सेंद्रिय शेतीतून आदर्श निर्माण

नानादरो बी. मार्कचे घर पश्चिम गारो हिल्सच्या टेकड्यांमध्ये आहे. 1980 च्या दशकात मार्कला त्याच्या सासरच्यांकडून 5 हेक्टर जमीन वारसाहक्काने मिळाली. त्यांनी प्रथम किरमुंडा मिरची जातीची लागवड केली. मार्कने सुरुवातीला 10 हजार रुपये खर्च करून 10 हजार झाडे लावली. हळूहळू त्याने झाडांची संख्या वाढवली. सेंद्रिय शेती करून त्यांनी आदर्श निर्माण केला. 2019 मध्ये मार्कने 19 लाख रुपयांच्या मिरचीचे उत्पादन केले.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

आज जगभरात काळ्या मिरचीला मोठी मागणी आहे. मार्क यांनी काळ्या मिरीचीची सेंद्रिय शेती करून आदर्श निर्माण केला आहे. सध्या काळी मिरी 600 रुपये किलोने विकली जात आहे. केंद्र सरकारने 72 व्या प्रजासत्ताक दिनी सेंद्रिय शेतीसाठी मार्क यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

काळी मिरचीची लागवड कशी केली जाते?

काळी मिरची लागवडीसाठी योग्य हवामान अत्यंत आवश्यक आहे. हे पीक अति थंडीत किंवा अति उष्णतेमध्ये वाढत नाही. भारतामध्ये केरळ आणि महाराष्ट्र ही काळी मिरी उत्पादनासाठी उत्तम ठिकाणे आहेत. मात्र, याशिवाय अनेक ठिकाणी काळ्या मिरचीची लागवड केली जाते. हवामानात जितका जास्त ओलावा असेल तितक्या वेगाने काळी मिरी वेल वाढते. त्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम तापमान 20 ते 30 अंशांच्या दरम्यान आहे. भारी जमिनीबरोबरच पाणी साचलेली जमीनही या पिकासाठी योग्य आहे. मातीचा pH 5.5 ते 6.5 च्या दरम्यान असावा. काळी मिरी लागवडीसाठी 125 ते 200 सेमी पावसाची गरज असते.

झाडे किती दिवसात तयार होतात

काळी मिरचीची रोपे लावण्यासाठी उत्तम काळ म्हणजे मार्च आणि एप्रिल महिना. काळी मिरचीच्या दोन झाडांमधील अंतर 8-8 फूट असावे. त्यामुळे झाडे चांगली वाढण्यास मदत होते. मिरचीच्या झाडांना इतर झाडांवर चढण्यासाठी आधार दिला जातो. वेलीला 3 वर्षांनी खत द्यावे. काळी मिरी लागवडीनंतर 7-8 महिन्यांनी काढली जाते.

महत्वाच्या बातम्या:

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, तरुणांना रोजगार, ‘या’ उपक्रमांद्वारे ग्रामीण भारतात होतायेत मोठे बदल

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.