आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 मे 2025
esakal May 13, 2025 02:45 PM

पंचांग -

मंगळवार : वैशाख कृष्ण १, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ५.४७, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सायंकाळी ७.४६, चंद्रास्त सकाळी ६.१४, नारद जयंती, भारतीय सौर वैशाख २३ शके १९४७.

दिनविशेष -

  • १९९६ - प्रसिद्ध लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सोच समझ के’ या भारतीय कुटुंबनियोजन संस्थेच्या निर्मितीला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

  • १९९६ - महिला जागतिक क्रमवारीत ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीची टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफच्या नावावर जमा.

  • २००६ - अमेरिकेचा धावपटू जस्टिन गॅट्लीन याने शंभर मीटर शर्यत ९.७६ सेकंदांत पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.