शुबमन गिल मित्र नाही तर… अनाया बांगरने सांगितली मन की बात
GH News May 13, 2025 06:08 PM

क्रिकेटविश्वात शुबमन गिलला प्रिंस म्हणून उपाधी मिळाली आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. शुबमन गिलने अल्पावधीतच क्रिकेट विश्वात आपलं नाव केलं आहे. दुसरीकडे, शुबमन गिलच्या अफेअरची चर्चा रंगत असते. पण शुबमन गिलने नुकतंच आपल्या मुलाखतीत सर्व बातम्यांचं खंडन केलं होतं. आता शुबमन गिलबाबत अनाया बांगरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनाया बांगर भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी आहे. अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत यशस्वी जयस्वालसोबत खेळला आहे. यशस्वी जयस्वाल तेव्हा मुलगा होता. त्याची ओळख संजय बांगरचा मुलगा अशी होती. लिंग परिवर्तन करण्यापूर्वी त्याचं नाव आर्यन होतं. पण लिंग परिवर्तन करून आर्यन आता अनाया झाली आहे. अनाया बांगरने लिंग परिवर्तन केल्यानंतर फिल्मीज्ञानला एक मुलाखत दिली. त्यात तिने भारतीय क्रिकेट टीममधील अनेक खेळाडूंबाबत आपलं मत ठेवलं. यावेळी अनायापुढे हॅशटॅग देऊन त्यांचा उल्लेख करायचा होता. त्यामुळे अनाया बांगरच्या मनात इतर खेळाडूंबाबत काय भावना आहेत त्या उघड झाल्या.

यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खानला अनायाने मित्र संबोधलं

मुलाखतीची सुरुवातीला सरफराज खानचं नाव घेतलं. तेव्हा अनायाने त्याच्यासाठी फ्रेंड हे हॅशटॅग वापरलं. नुकतीच अनायाने सरफराज खानची त्याची घरी जाऊन भेट घेतली होती. तसेच आपल्या मैत्रीबाबत सांगितलं होतं. त्यामुळे या दोघांची मैत्री सर्वश्रूत आहे. त्यानंतर यशस्वी जयस्वालचं नाव पुढे आलं. तेव्हा अनाया बांगरने त्याच्यासाठीही फ्रेंड हॅशटॅगचा वापर केला. त्यानंतर शुबमन गिलचं नाव घेतलं आणि अनायाच्या रिएक्शनकडे लक्ष लागून राहीलं. तेव्हा अनायाने थोडासा विचार केला. तसेच हॅशटॅग फ्रेंड नाही तर हॅशटॅग क्रिकेटर वापरलं.

शुबमन गिलनंतर भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचं नाव घेतल. तेव्हा अनायाने वेगळी एक्शन करत हॅशटॅग वापरला. अनाया बांगरकडे विराट कोहली आणि रोहित शर्मासाठीही हॅशटॅगचा वापर करण्यात सांगितला. तेव्हा विराटचसाठी एग्रेशन आणि रोहित शर्मासाठी एक्चुअर गाय हॅशटॅगचा वापर केला. सूर्यकुमार यादवसाठी अनाया ने स्कूप शॉट हॅशटॅगचा वापर केला. तर ईशान किशनसाठी अंडर 19 वर्ल्डकप हॅशटॅगचा वापर काला. नितीश कुमार रेड्डीसाठी ऑलराउंडर हॅशटॅगचा वापर केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.