Tea Bag : टी बॅग्जचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक
Marathi May 13, 2025 10:25 PM

भारतात चहाप्रेमींची काही कमी नाही. दिवसाची सुरुवात ते रात्री झोपेपर्यत दिवसातून पाण्यासारखे चहा पिणारे आपण पाहिले असतीलच. अनेक ऑफिसेसमध्ये कामाच्या व्यापातून फ्रेश वाटावं म्हणून हल्ली कित्येकजण टी बॅग्ज वापरतात. सध्या टी बॅग्ज वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. अनेक महिला देखील घरात या टी बॅग्जचा वापर करतात, यामुळे चहा उकळल्यानंतर होणारी घाण आणि वेळ वाचवण्यास मदत होते. टी बॅग्ज मानसिक आरोग्य, त्वचेची निगा आणि केसांचे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण, तुम्हाला माहिती आहे का? टी बॅग्जचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. आजच्या लेखातून आपण जाणून घेऊयात, टी बॅग्जचे आरोग्यावर होणारे परिणाम

आरोग्यावर परिणाम करणारे घटक –

रसायने –

बहुतेक टी बॅग्ज प्लास्टिक किंवा नायलॉनसारख्या पदार्थापासून बनवल्या जातात. त्यामुळे जेव्हा तुम्हा या टी बॅग्ज गरम पाण्यात बुडवल्यावर त्या मायक्रोप्लास्टिक सोडू शकतात, चहाद्वारे हे प्लास्टिक शरीरात प्रवेश करते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

विषारी पदार्थ –

स्वस्त दर्जाच्या टी बॅग्ज केमिकल प्रक्रिया करून जास्तीत जास्त टिकवल्या जातात. त्यामुळे चहाद्वारे यातील केमिकल शरीरात पोहोचू शकतात.

कॅफिन –

ऑफिसमध्ये असल्यावर दिवसभरात अनेकदा चहा पिण्यात येतो. परिणामी, शरीरात जास्त प्रमाणात कॅफिन जमा होऊ शकते. शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढले की, झोपेवर परिणाम होतो, ब्लड प्रेशर वाढू शकते आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.

दात –

टी बॅग्जमध्ये टॅनिन असण्याची शक्यता असते. टॅनिनमुळे दातांवर डाग पडतात.

पचनसंस्थेवर परिणाम –

टी बॅग्जच्या अतिसेवनानेअपचन किंवा पोटदुखी यासारख्या पचन तक्रारी सुरू होतात.

पौष्टिकतेचा अभाव –

बऱ्याच टी बॅग्जमध्ये वापरल्या जाणाऱ्या चहाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असते. हा चहा पानांपासून नाही तर डस्ट ग्रेडपासून तयार करण्यात येतो. त्यामुळे या चहात पौष्टिकतेचा अभाव दिसून येतो.

 

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.