
Getty Images
भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमिअर लीगचे सामने स्थगित करण्यात आले होते. ते 17 मे पासून पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा BCCI ने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत ऑपरेशन सिंदूर स्थगित करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर IPL चे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
उर्वरित एकूण 17 सामने 6 ठिकाणांवर खेळले जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.
बंगळुरू, जयपूर, दिल्ली, मुंबई, लखनौ आणि अहमदाबाद या ठिकाणी हे सामने होतील. क्वालिफायर्स आणि अंतिम सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

BCCI
उर्वरित सामने पुढीलप्रमाणे :
- 17 मे - शनिवार - 7.30 PM - बंगळुरू - रॉयल चॅलेंजर्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
- 18 मे - रविवार - 7.30 PM - जयपूर - राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स
- 18 मे - रविवार - 7.30 PM - दिल्ली - दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स
- 19 मे - सोमवार - 7.30 PM - लखनौ - लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायजर्स हैदराबाद
- 20 मे - मंगळवार - 7.30 PM - दिल्ली - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
- 21 मे - बुधवार - 7.30 PM - मुंबई - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स
- 22 मे - गुरुवार - 7.30 PM - अहमदाबाद - गुजरात टायटन्स वि. लखनौ सुपर जायंट्स
- 23 मे - शुक्रवार - 7.30 PM - बंगळुरू- रॉयल चॅलेंजर्स वि. सनरायजर्स हैदराबाद
- 24 मे - शनिवार - 7.30 PM - जयपूर - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
- 25 मे - रविवार - 3.30 PM - अहमदाबाद - गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स
- 25 मे - रविवार - 7.30 PM - दिल्ली - सनरायजर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स
- 26 मे - सोमवार - 7.30 PM - जयपूर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स
- 27 मे - मंगळवार - 7.30 PM - लखनौ - लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 29 मे - क्वालिफायर -1 - गुरुवार- 7.30 PM - स्थान अजून निश्चित नाही
- 30 मे - इलिमिनेटर - शुक्रवार - 7.30 PM - स्थान अजून निश्चित नाही
- 1 जून - क्वालिफायर - 2 - रविवार - 7.30 PM - स्थान अजून निश्चित नाही
- 3 जून - अंतिम सामना - मंगळवार - 7.30 PM- स्थान अजून निश्चित नाही
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)