Pakistan Air Force India Kashmir: पाकिस्तान सरकारने भारताची चांगलीच धास्ती घेतली आहे. भारताच्या दहशतीमुळे पाकिस्तानने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पाकिस्तान सरकारने काश्मीरजवळ स्वात खोऱ्यात असलेल्या विमानतळाला लष्करी अड्डा बनवण्यास सुरुवात केली आहे. उपग्रहाकडून मिळालेल्या छायाचित्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या ठिकाणी फायटर जेट विमाने ठेवण्यासाठी शेल्टर बनवले जात आहे. तसेच धावपट्टीचा विस्तारही केला जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रन्सपोर्ट प्लेनपासून फायटर जेटपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. विश्लेषकांच्या अंदाजानुसार काश्मीरच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सैदू शरीफ एअरबेस अपग्रेड केल्यावर पाकिस्तानी हवाईदल नियंत्रण रेषा ओलांडून सहज भारतात दाखल होऊन हल्ला करु शकते.
सैदू शरीफ विमानतळामुळे पाकिस्तानी हवाईदल भारताच्या सीमेपर्यंत पाकिस्तानी लष्कराला सहज मदत देऊ शकते. पाकिस्तानच्या स्वात व्हॅलीला ‘पाकिस्तानचे स्वित्झर्लंड’ म्हटले जाते. जगभरातून हजारो पर्यटक दरवर्षी येथे येतात. स्वातसारख्या सुंदर खोऱ्यात पाकिस्तानचे हे विमानतळ लष्कारासाठी महत्वाचे ठरणार आहे. त्या ठिकाणी पाकिस्तानी लष्कर आपले लढाऊ विमाने सहज तैनात करु शकणार आहे. त्यातमध्ये सी-130 ट्रान्सपोर्ट प्लेन आणि सर्व प्रकारचे फाइटर जेटचा समावेश आहे. पाकिस्तानी हवाईदलाकडे एफ-16, जेएफ-17 आणि जे-10 सी फायटर जेट आहेत.
पाकिस्तानी हवाई दल येथे 4 मजबूत शेल्टरची उभारणी करत आहे. जेणेकरून तेथे विमाने तैनात करता येतील. पाकिस्तानचा हा एअरबेस श्रीनगरपासून केवळ 230 किमी अंतरावर आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या एअरबेसच्या माध्यमातून पाकिस्तानी हवाई दल भारताविरुद्ध एलओसीच्या आघाडीवर आपली ताकद वाढवत आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेले विमानतळ लष्करी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. हे विमानतळ 1978 मध्ये पहिल्यांदा बांधण्यात आले होते.
भारतीय सीमेजवळ असलेल्या या विमानतळामुळे पाकिस्तानी लष्कर वेगाने हवाई हल्ला करु शकतो. नवीन एअरबेसमुळे पाकिस्तानी लष्कराला आपले सैन्य या ठिकाणी तैनात करणे सोपे झाले आहे. भारत पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर कधी हल्ला करु शकतो, ही भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येने सैनिक पाकिस्तानने एलओसीच्या दुसरीकडे ठेवले आहेत. दुसरीकडे भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी आपले एस 400 मिसाइल डिफेन्स सिस्टम कश्मिरात तैनात केले आहेत.