Latest Marathi News Updates : कोरटकरच्या जामिनाच्या अर्जावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार
esakal April 07, 2025 05:45 PM
Prashant Koratkar Live: कोरटकरच्या जामिनाच्या अर्जावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी

प्रशांत कोरटकरच्या जामिनाच्या अर्जावर आज दुपारी दोन वाजता कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान प्रकरणी कोरटकर सध्या तुरुंगात आहे. त्याला आज जामीन मिळतो की कारावास वाढतो, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

Shehzad Poonawalla Live: बाळासाहेब ठाकरेंनी वक्फ बोर्ड पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली होती - भाजप नेते शेहजाद पूनावाला

शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की ‘वक्फनंतर ख्रिश्चन, जैन, शीख आणि मंदिरांच्या जमिनीवर भाजपचा डोळा आहे’ या कथित विधानावर भाजप नेते शेहजाद पूनावाला म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी सांगावे की त्यांची काय मजबुरी आहे की, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी वक्फ बोर्ड पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली होती आणि आता त्यांचे लोक वक्फचे विरोधक बनत आहेत."

Pune Live : पुण्याच्या तापमानात वाढ, पारा चाळीशीपार

पुण्यात अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता पण आता तापमानात वाढ झाली असून कमाल तापमानाने चाळीशी पार केली आहे.

Pune Live : जीम ट्रेनरचा पानशेत धरणात बुडून मृत्यू

पुण्यातील एका जीम ट्रेनरचा पानशेत धरणात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

Kalamba Jail LIVE : कळंबा कारागृहात चिमुकलीला भाजले

कोल्हापूर : आईसोबत कळंबा कारागृहाच्या बरॅकमध्ये असलेली जीनली भगत काळे (वय दीड वर्षे) या चिमुकलीला आमटीच्या भांड्यात पडल्याने भाजले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. हाताला, मांडीला, पाठीला गंभीर इजा झाल्याने तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. भगत काळे व त्याची पत्नी आशा (रा. सातारा) हे खुनाच्या गुन्ह्यात कळंबा कारागृहात आहेत.

Miraj Crime : मिरजेत २ लाख ४५ हजारांचा मद्यसाठा जप्त, 'उत्पादन शुल्क'ची कारवाई

मिरज : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करून सुमारे २ लाख ४५ हजार ३२५ रुपये किमतीच्या मद्यसाठ्यासह मोबाईल आणि वाहन असा २२ लाख ४ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी मद्याचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या अजिंक्य विजय गवळी आणि अरविंद तानाजी बेडगे (रा. मिरज) या दोघांना अटक करण्यात आली.

Shivraj Singh Chauhan LIVE : देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आज नंदूरबार दौऱ्यावर

देशाचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे आज नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नंदुरबार कृषि विज्ञान केंद् आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र द्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या 'कृषक ज्ञान विज्ञान मंडपम्' किसान ज्ञान संवर्धन केंद्र यासोबतच 'महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क' या वास्तूंचा लोकार्पण सोहळा कृषिमंत्री चौहान यांच्या हस्ते होईल.

Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

नवी दिल्ली : संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल झाली आहे. या विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळून त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या विधेयकाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल आहेत. आजची याचिका केरळमधील समास्था केरला जमियाथुल उलेमा या संघटनेने केली आहे.

Rahul Gandhi LIVE : कन्हैया कुमार यांच्या पदयात्रेत सहभागासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी बिहारला रवाना

दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी बिहारला रवाना झाले आहेत. ते बेगुसराय येथे एनएसयूआयचे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार यांच्या 'पालयन रोको नोकरी दो' यात्रेत सामील होतील आणि नंतर पाटण्यातील जाहीर सभेला संबोधित करतील.

Manikrao Kokate LIVE : मंत्री कोकाटे यांच्या निषेधार्थ स्वाभिमानीचे सांगलीत आंदोलन

सांगली : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन किल्ले मच्छिंद्रगड येथे करण्यात आले. यावेळी कृषिमंत्री कोकाटे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

Kolhapur News : कोल्हापुरातील ए, बी, ई वॉर्डमधील पाणीपुरवठा आज बंद

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेवरील व्हॉल्व्ह दुरुस्ती, तसेच आपटेनगर टाकीचे कनेक्शनचे काम यामुळे आज (ता. ७) ए, बी, ई वॉर्डमधील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, मंगळवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या कामांसाठी थेट पाईपलाईन योजनेचे पाणी बंद ठेवावे लागणार आहे.

Prashant Koratkar LIVE : कळंबा कारागृहात असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी

कोल्हापूर : कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सोमवारी (ता. ७) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन फेटाळल्याने एक एप्रिलपासून कोरटकर कळंबा कारागृहात आहे. आज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर जामीन अर्जावर युक्तिवाद झाल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Anant Ambani LIVE : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र व रिलायन्स समूहाचे संचालक अनंत अंबानी यांची १७० किमीची पदयात्रा पूर्ण

Latest Marathi Live Updates 7 April 2025 : कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज (ता. ७) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच विविध सरकारी विभागांतून कर्मचाऱ्यांची कपात, आयातशुल्कामुळे महागाईवाढीची शक्यता, ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाविरोधातील अध्यादेश आणि इतर अनेक निर्णयांचा व धोरणांचा निषेध करत अमेरिकी जनता रस्त्यांवर उतरलीये. पायी तीर्थयात्रा करण्याची भारतीयांची परंपरा उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र व रिलायन्स समूहाचे संचालक अनंत अंबानी यांनीही जपली असून अंबानी कुटुंबीयांचे मूळ गाव असलेल्या जामनगरपासून द्वारकेपर्यंतचे १७० किलोमीटरचे अंतर त्यांनी चालत पूर्ण केले. लातूर येथील महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी (ता. ५) मध्यरात्री डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमधील संघर्ष आणि कलह सध्या तरी कमी झाला आहे. पक्षाच्या हायकमांडने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पक्षाच्या राज्य शाखेच्या प्रमुखपदी कायम राहण्यास सांगितले असल्याचे काँग्रेस सूत्रांनी रविवारी सांगितले. देशाचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे आज नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्य महिला आयोगाची आज पुण्यात बैठक होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून काही भागांत पाऊस पडत असून पिकांचे नुकसान होत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.