Maharashtra News Live Updates : पक्षात जातीचे सेल उघडणे ही मोठी चूकच, बावनकुळेंनी तसे करू नये - गडकरी
Saam TV April 07, 2025 05:45 PM
पंढरपुरात चंद्रभागा नदी पात्रात घाणीचे साम्राज्य

चैत्री एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरातील चंद्रभागा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले असले तरी सोडलेले पाणी अस्वच्छ आणि घाण झाले आहे. यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.उद्या चैत्री यात्रेचा सोहळा साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. येथे आलेले भाविक चंद्रभागा स्नान करतात. मागील अनेक दिवसांपासून नदी आणि पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले आहे. त्यामुळे अस्वच्छ झाले आहे. पाणी स्वच्छ करणारी सेबर टेक्नॉलॉजी यंत्राणा ही मागील तीन महिन्यांपासून ठप्प झाली आहे. कोट्यावधी रूपयांचा शासनाचा खर्च पाण्यात गेला आहे.

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयप्रकरणी चौकशी समिती वादात?

पुण्यातील मनसे चे राम बोरकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या वैद्यकीय समिती मध्ये असणाऱ्या सदस्यांच्या विरोधात आक्षेप

मनसे चे बोरकर यांचा चौकशी समिती चे डॉ राधाकृष्ण पवार यांच्यावर गंभीर आक्षेप

राधाकृष्ण पवार यांना चौकशी समितीचे अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी

डॉक्टर पवार यांच्या शासकीय कामकाजातील अनियमितता व गैरव्यवहाराबाबत अनेक तक्रारी असून त्या विरोधात विधानसभेत आरोप करण्यात आले आहेत असे पत्रात नमूद

या विषयावर लक्षवेधी घेऊन चर्चा करण्यात आली मात्र त्यावर गांभीर्याने कारवाई झाली नाही असं असताना वादग्रस्त अधिकाऱ्याकडे गंभीर प्रकरणाची चौकशी संपूर्ण कितपत योग्य, बोरकर यांचा सवाल

Maharashtra News Live Updates : पक्षात जातीचे सेल उघडणे ही मोठी चूकच, बावनकुळेंनी तसे करू नये - गडकरी Nashik : नाशिकमध्ये उन्हाचा पारा चांगलाच तापला

- १० वर्षात पहिल्यांदाच एप्रिलच्या सुरुवातीलाच नाशिकचा पारा चाळीशीपार

- रविवारी नाशिकमध्ये ४०.२ इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद

- सकाळी ८.३० वाजता १८.७ अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी ४.३० वाजता ४०.२ अंशांवर

- सकाळनंतर दिवसभरात तापमानात २१.५ अंशांची वाढ

- पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढताच राहणार, हवामान विभागाचा अंदाज

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी....

राज्यातील 24 जिल्हे व 103 तालुके हे अतिवृष्टीमुळे बाधीत झाले असून पिकांचे आणि खासरुन कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळए पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱयांना दिले आहे. याबाबतची आठ दिवसात संपुर्ण राज्याची नुकसानीचे आकडेवारी कळेल. मात्र मुख्यमंत्री आणि राज्यातील दोन्ही मंत्र्यांशी तातडीने चर्चा करुन शेतकऱयांना काहीना काही मदतीबाबत चर्चा करणार असल्याची माहीती राज्याचे कृषीमंत्री अँड माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. आज त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त ठाणेपाडा शिवारातील कांदाशेतीची पाहणी केली आहे. यावेळी वायागेलेल्या कांदा पिकाबाबत त्यांनी शेतकऱयांशी चर्चा करुन त्याबाबत काय कार्यवाही करता येईल यांची चर्चा देखील केली. इतकच काय तर नंदुरबार जिल्ह्या दौऱयांवर येणाऱया केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे देखील केंद्राकडून मदत मागण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल अशी माहीती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.

वडमाळ आदिवासी वाडीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्ता

रायगडच्या पेण तालुक्यातील वडमाळ आदिवासी वाडीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ता मिळाला आहे. दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या या वाडीतील नागरिकांचे रस्त्या अभावी हाल होत होते. आजारी व्यक्तीला डॉक्टर कडे नेणे देखील मुश्किल होत होते. या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने आंदोलने, पाठपुरावा केला त्यानंतर आता रस्ता तयार करण्यात आला आहे त्यामुळे ग्रामस्थांची वर्षानुवर्षे सुरू असलेली पायीपिट थांबली आहे. रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आदिवासी वाडी ग्रामस्थ एकत्र आले आसून त्यांनी पुजा करीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला.

गेल्या वर्षात पुणे शहरात एकूण ८६२ जणांच्या आत्महत्या

एकूण दाखल झालेल्या आत्महत्या मध्ये सर्वाधिक ५८३ आत्महत्या पुरुषांच्या

पुणे पोलिसांच्या रेकॉर्ड मधून धक्कादायक माहिती समोर

बदलेली जीवनशैली, प्रेमभंग, करिअर, शिक्षणातील स्पर्धा, नोकरीतील ताण तणाव आत्महत्येची काही प्रमुख कारणे

औद्योगिक वसाहत, कामगार वस्ती मध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक

शहरात खाजगी सावकारांच्या छळाला बळी पडून आत्महत्या केलेल्यांची संख्या सुद्धा मोठी

कोणत्या वर्षात किती आत्महत्या

२०२१: ३५४ स्त्री, ६२८ पुरुष

२०२२: २४२ स्त्री, ७५४ पुरुष

२०२३: १९६ स्त्री, ७३२ पुरुष

२०२४: २०६ स्त्री, ५८३ पुरुष

राज्य महिला आयोगाची आज पुण्यात बैठक

बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर करणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा

सकाळी ११ वाजता पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीसाठी

या बैठकीत पुणे शहरातील महिला सुरक्षितता,दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूती संबंधी राज्य शासनाची समिती अहवाल सादर करणार

११.५० वाजता रूपाली चाकणकर माध्यमांशी संवाद साधणार

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा,भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे वर्चस्व

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर निकाल जाहीर झाला असुन जिल्हा मजूर फेडरेशन वर महायुतीचा झेंडा फडकला.मजूर फेडरेशनवर सुरुवातीपासूनच भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे.जिल्हा मजूर फेडरेशनचे १३ पैकी १२ उमेदवार महायुतीचे निवडून आले.आ.पाटील यांच्या गटाच्या चार जागा सुरुवातीला बिनविरोध निवडून आल्या होत्या.उर्वरित ९ जागासाठी निवडणूक झाली होती त्यात लोहाऱ्याची जागा महाविकास आघाडीने केवळ १ मताने जिंकली व आ.राणा पाटील यांच्या पॅनलच्या ८ जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या दरम्यान निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तर आमदार राणा पाटील यांची नवनियुक्त सदस्यांचा यावेळी सत्कार केला.

पुणे विमानतळावरून प्रवाशी संख्या एक कोटीच्या पुढे

पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ

गेल्या वर्षभरात पुणे विमानतळावरून १ कोटी ५ लाख प्रवाशांनी केला प्रवास

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवास करणाऱ्यांची संख्या १०.६६ टक्क्यांनी वाढली

गतवर्षी डिसेंबर २०२४ हा महिना पुणे विमानतळावरून सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा ठरला आहे

डिसेंबर महिन्यात ९ लाख ५४ हजार प्रवाशांनी पुणे विमानतळाचा वापर केला त्यामध्ये ९ लाख २० हजार देशांतर्गत आणि ३३ हजार ३३७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता

देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर.....

देशाचे कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून नंदुरबार कृषि विज्ञान केंद् आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र द्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या 'कृषक ज्ञान विज्ञान मंडपम्' किसान ज्ञान संवर्धन केंद्र यासोबतच 'महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क' या वास्तूंचा लोकार्पण सोहळासाठी कृषिमंत्री शिवराजसिंहजी चौहान नंदुरबार येणार आहेत यावेळी ते शेतकरी मेळावाला देखील संबोधित करण्यात आहेत.. देशाचे कृषिमंत्री हे नंदुरबार च्या शेतकऱ्यांना कोणतं गिफ्ट देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

उल्हासनगरात इमारतीचा सज्जा घरावर कोसळला

उल्हासनगरमध्ये इमारतीचा सज्जा शेजारील घरावर कोसळून दोन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. यानंतर या इमारतीबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार जखमी मुलींच्या आईने केली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील महाराजा हॉल परिसरात पार्वती ही धोकादायक इमारत आहे. या इमारतीचा मागील बाजूचा सज्जा घरावर कोसळला. ही इमारत धोकादायक असून बाजूला अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामुळं।महापालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झालेली इमारत पाडावी, अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जातेय.

अंबरनाथमध्ये नगरसेवकाच्या ऑफिसवर हल्ला प्रकरण , तीन हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या

अंबरनाथ पालिकेतील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या बी केबीन रोडवरील कार्यालयावर शनिवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेल्या १० ते १२ हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला चढवला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं रवाना केली असून आत्तापर्यंत ३ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे सर्व हल्लेखोर अंबरनाथचेच असून त्यांच्या इतर साथीदारांच्या मागावर सध्या शिवाजीनगर पोलीस आहेत. हा हल्ला नेमका का करण्यात आला? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

केंद्र सरकारकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या 'एनएमएमएस' परीक्षेत मास कॉपी..?

धाराशिव मधील लोहारा येथील वसंतदादा पाटील विद्यालयातील परीक्षा केंद्रावर मास कॉफी झाल्याचा आरोप

लोहारा येथील एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या 271पैकी 115 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक,अनेक विद्यार्थ्यांना समसमान गुण

तर जिल्हाभरातील इतर 12 परीक्षा केंद्रावरील 6264 विद्यार्थ्यांपैकी 90 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून मास कॉफी झाल्याचा आरोप

परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी, तसेच चौकशी करून ज्यांच्या सहकार्याने कॉपी झाली त्यावर कारवाईचीही मागणी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पत्र

Byte:बाळकृष्ण तांबारे,राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

कर्जतमधील साकारली येथे 30 फूट उंच श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे शानदार लोकार्पण

राम नवमीच्या मुहूर्तावर आज रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे 30 फुट उंच भव्य आशा श्री रामाच्या मुर्तीचे लोकार्पण करण्यात आले. फटाकांची आतिषबाजी, भगव्या पताका, रामनामाचा जयघोष आणि शंखध्वनीने संपूर्ण गणेश घाट परिसर राममय झाला होता. कर्जत तालुक्यातील सावरोली येथील गणेश घाटावर या श्री रामाची मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून हि मुर्ती साकारण्यात आली आहे. या मुर्तीच्या लोकापर्णा पुर्वी सकाळ शास्त्रोक्त पुजा, होम हवन, अभिषेक करण्यात आला. व शास्त्रोक्त होम-हवनाने मंगल प्रारंभ झाला. सायंकाळी आमदार महेंद्र थोरवे आणि मान्यवरांच्या हस्ते या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. आ. महेंद्र थारवे यांच्या सोबत माजी आमदार सुरेश लाड, महामंडलेश्वर श्रीमहंत चंद्रदेवदासजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

Maharashtra News Live Updates : पावसाचे संकेत देणारा बहावा बहरला, यंदा पाऊस लवकर पडणार ?

निसर्गाचा शॉवर इंडीकेटर म्हणून ओळखला जाणारा बहावा यंदा भरपूर फुलला आहे. रस्त्याच्या कडेला बहावाच्या झाडाला गर्द पिवळया फुलांचे घोष लोंबताना दिसताहेत. पिवळ्या धमक फुलांनी बहरलेला बहावा रणरणत्या उन्हात मनाला आणि डोळयाला आनंद देतो आहे. बहावा फुलल्यानंतर साधारण ४५ दिवसांनी पाऊस पडतो असा समज आहे. दरवर्षी एप्रिलच्या मध्यानंतर फुलणारा बहावा यंदा मार्च अखेरीसच फुललाय. त्यामुळे यावर्षी पाउस लवकर पडेल, असे जाणकार सांगतात. सध्या रायगडमध्ये रस्त्यालगत किंवा जंगलभात बहावाच्या झाडावर लोंबणारे फुलांचे पिवळे झुंबर मन मोहवून टाकत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.