कामशेतमध्ये सहा लाखांची घरफोडी
esakal April 07, 2025 11:45 PM

तळेगाव दाभाडे, ता. ७ ः कामशेत येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ६ लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घरफोडी ४ एप्रिल ते ६ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी यशराज हेमेंद्र किनावाला (वय २८ वर्षे, व्यवसाय, रा. फ्लॅट नं. ९०५ बी विंग, मंत्रा टाऊनशिप, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे दाजी राहुल नवीन प्रभू यांचे घर गरुड कॉलनी, कामशेत येथे आहे. त्या घराचे दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडले व कडीकोडा उचकटून घरात प्रवेश केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.