कौलवमध्ये भाजपचा स्थापना दिन उत्साहात
esakal April 07, 2025 11:45 PM

4326
कौलव : येथे भाजपच्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी रवीश पाटील व ग्रामस्थ.
.......
कौलवमध्ये भाजपचा स्थापना दिन उत्साहात
शाहूनगर, ता. ७ ः भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस कौलव (ता. राधानगरी) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील- कौलवकर यांच्या हस्ते येथील मारुती मंदिर चौकात साखर-पेढे वाटप करण्यात आले.
रवीश पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. भाजपच देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतो. त्यामुळे भविष्यकाळात देशाचा विकास घडवून आणण्यासाठी सर्वांनी भाजपच्या विचारधारेत सहभागी व्हावे.’
यावेळी रंगराव चरापले, सदाशिव हुजरे, राजेंद्र पाटील, एस. डी. पाटील, आनंदा शिरगावे, शहाजी पाटील, दशरथ कांबळे, शंकर पाटील, निवास हुजरे, उत्तम चरापले, के. वाय. चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.