56084
‘मराठा प्रीमियर लीग’मध्ये
एक्स ब्रँड संघाचा विजय
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः मळगाव येथील आझाद मैदानावर दोन दिवस चाललेल्या मराठा प्रीमियर लीग स्पर्धेत अंतिम सामन्यात एक्स ब्रँड संघाने अष्टविनायक संघाचा पराभव करत ‘मराठा प्रीमियर लीग’ चषकावर नाव कोरले.
व्हॉईस ऑफ मीडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. यावेळी भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ, परफेक्ट अकॅडमीचे संचालक प्रा. राजाराम परब, राजेश राऊळ, गुरुनाथ गावकर उपस्थित होते. दुबईहून खास या क्रिकेट लीग स्पर्धेसाठी आलेला तुषार राऊळ संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर ठरला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून समीर मळगावकर, उत्कृष्ट गोलंदाज समीर राणे, तर सर्व संघ मालकांना गौरविले. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक मळगाव येथील भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांच्याकडून ११ हजार रुपये, एक्स ब्रँडचे मालक समीर मळगावकर यांच्याकडून आकर्षक चषक, तसेच द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये मराठा मित्रमंडळाकडून, विलास ऊर्फ बंड्या दामोदर चिंदरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ योगेश दामोदर चिंदरकर यांच्याकडून आकर्षक चषक असे होते. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर चषक श्रीधर राऊळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजेश श्रीधर राऊळ यांच्याकडून पुरस्कृत केले होते. पंच म्हणून योगेश चिंदरकर, शिवप्रसाद परब यांनी काम पाहिले. उमेश गुडेकर, आदित्य ठाकूर, हेमंत गोसावी यांनी समालोचन केले.