मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सोमवारी (ता.7) वाढ केली आहे.
यात 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
एलपीजी सिलिंडरची किंमत यापूर्वी 803 रुपये होती, तर या किंमतीत वाढ होऊन आता 853 रुपये इतकी होईल.
उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत यापूर्वी 503 रुपये इतकी होती. ती आता 553 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) ही भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना LPG उपलब्ध करून देण्यासाठी, भारत सरकारने 2016 ला ही योजना सुरु केली आहे.
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रसारमाध्यमांना यांची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय किंमतीत वाढत होत असल्याने त्यांनी एलपीजीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
ऑगस्ट 2024 ला 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. त्यानंतर एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.