Devendra Fadnavis government 100 days Study Report : लोकसभेत झटका बसल्यानंतर विधानसभेला महाराष्ट्रात महायुतीने न भूतो न भविष्यति असा विजय मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली. यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार संभाळला. पण पहिल्याच १०० दिवसांत सरकारच्या कामगिरीवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. बीड, परभणी, नागपूर आणि पुण्यातील घटनेवरून विरोधकांनी रान उठवले होते. पण देवेंद्र फडणवीस सरकारच्या १०० दिवसांच्या कामकाजावर जनतेला काय वाटतेय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूह आणि पोल पंडित यांनी एकत्र केलाय. कामकाजावर महाराष्ट्रातील जनता समाधानी असल्याचे अहवालातून दिसून आलेय. नेमकं या अहवालात काय आहे, हे जाणून घेऊयात..
कामगिरीचे मुल्यांकन कसे कराल?
१०० दिवसातील देवेंद्र फडणवीस सकारच्या कामगिरीवर महाराष्ट्रातील जनता समाधानी असल्याचे अहवालातून दिसतेय. १०० दिवसातील फडणवीस सरकारचे काम चांगलं असल्याचे ५४ लोकांनी अहवालात सांगितलेय. तर १९ टक्के लोकांनी सरकारचे कामकाज सरकारी असल्याचा कौल दिलाय. महाराष्ट्रातील २७ टक्के जनतेला फडणवीस सरकारचे कामकाज खराब असल्याचे वाटतेय.
वरील आकड्यांवरून फडणवीस सरकारच्या कामगिरीबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक कल दिसत आहे. फडणवीस सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन अधिक सखोलपणे करण्यासाठी, त्यांच्या धोरणे, प्रकल्प आणि जनतेवर झालेल्या परिणामांचा विचार करावा लागेल. उदाहरणार्थ, १०० दिवसांच्या कार्यकाळात झालेल्या पायाभूत सुविधा विकास (जसे की मेट्रो प्रकल्प), शेतीसंबंधी योजना, आणि सामाजिक उपक्रमांचा सकारात्मक परिणाम जनतेला दिसल्याचे दिसतेय.
फडणवीस सरकारच्या १०० दिवसाच्या कामाला १० पैकी किती गुण?
देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामगिरीवर लोकांनी कशी वाटली, हे खोलवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी १ ते १० या रेटिंग स्केलवर निवड करण्यास सांगितले होते. त्यामध्ये १९ टक्के लोकांनी फडणवीस सकारला १० गुण दिले. काटावर असणारे म्हणजे, ५ गुण देणारे १५ टक्के लोक आहेत. तर १२ टक्के आणि १० टक्के लोकांनी अनुक्रमे ८ आणि ९ गुण दिले आहेत. महाराष्ट्रातील १३ टक्के लोकांनी फडणवीस सरकारला ७ गुण दिले आहेत. तर ४ टक्क्यांनी ६ गुण दिलेत. १०% लोकांनी सरकारला फक्त १ गुण दिला, तर ५% लोकांनी २ आणि ३ गुण दिले. ७% लोकांनी ४ गुण दिले आहे.
निष्कर्ष काय निघाला ?
विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत असल्यामुळे फडणवीस सरकारच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत प्रभावी कामगिरी होऊ शकते, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. फडणवीस सरकार पायाभूत सुविधा आणि विकासकामांवर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमध्ये अधिक दिसून आल्या आहेत.
सर्वे कसा आणि कुठे घेतला ?
सकाळ माध्यम समूह आणि पोल पंडित यांनी एकत्र फडणवीस सरकारच्या १०० दिवसांची कामगिरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाहणी अहवाल तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातील नागरिकांचे मत जाणून घेतले. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना फडणवीस सरकारच्या कामकाजावर काय वाटतं? हे जाणून घेतलंय. शेती, आरोग्य, नोकरी, कायदा-सुव्यवस्था यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. महाराष्ट्रातील ६९९२ लोकांकडून राज्य सरकारच्या १०० दिवसाच्या कामकाजावर मत जाणून घेतले. यामधील ३२६२ शहरी भागातील तर ग्रामीण भागातील ३७३० जणांनी मत नोंदवलं.