रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bengaluru) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 20 व्या सामन्यात 12 धावांनी मात केली आहे. आरसीबीने मुंबईला विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 9 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 209 धावाच करता आल्या. आरसीबीने यासह 10 वर्षांची प्रतिक्षा संपवली. आरसीबीने वानखेडे स्टेडियममध्ये 2015 नंतर पहिल्यांदा विजय मिळवला. तर आरसीबीचा हा या मोसमातील तिसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा घरच्या मैदानातील पहिला आणि एकूण चौथा पराभव ठरला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.