दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील आंदोलनाचा आणि सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलचा काय संबंध आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली पाहिजेत, असे शहराध्यक्ष म्हणतात. पण तुम्ही भलत्याच्या दारात जाऊन आंदोलने करता, असं म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, सुश्रुत घैसास तिथे राहत पण नाहीत. त्यांचा तो दवाखाना पण नाही. तिथे जाऊन आंदोलन करणं, तोडफोड करणं, वस्तू फेकून देणं हे चुकीच आहे. आंदोलन त्यांनी शहराच्या अध्यक्षांना विचारून केलं नाही. सहनिशा करण्यासाठी आमचे वरिष्ठ समर्थ आहेत. जे काही निष्कर्ष निघतील त्यातून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई होईल. दोषी असतील तर कारवाई झाली पण पाहिजे.
अनामत रक्कम घेतली जात नाही, असं मी म्हटलं नाही. पत्रामध्ये मी दिनानाथ मंगेशकर रुग्णालायाची बाजू घेतलेली नाही. आमचे वरिष्ठ सक्षम आहेत. माझा त्यांच्यावर भरोसा आहे. पहिला मोर्चा अध्यक्षांच्या आपल्या वरिष्ठांवर विश्वास आहे का नाही. त्यांना आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे का नाही. त्यांचा विश्वास आहे का नाही हे माझं म्हणणं आहे. ज्या डॉक्टरचा त्याच्यामध्ये संबंध नाही त्यांच्या क्लिनिकमधून धुमाकूळ घालणं हे मला पटलं नाही, असं कडक शब्दात खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, जे महिला आघाडीने आंदोलन केलं त्याबद्दलची लोकांमध्ये चीड निर्माण झाली. त्याबद्दल आम्ही लोकांना सॉरी म्हणतो. नागरिकांच्या मनामध्ये जो रोष निर्माण झाला तेवढ्यापुरतच माझं हे पत्र निगडित आहे. आमचा वरिष्ठांच्या न्याय प्रविष्ठेवर विश्वास आहे. त्यावेळेला मी पुण्यात नव्हते.राहुल सोलापूरकर यांनी स्वतःचा स्पष्टीकरण दिलं आहे.
मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची वकिली करत नाही किंवा राहुल सोलापूरकरची ही वकिली करत नाही. मी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.माझं मन उदास पण त्याला नाईलाज आहे. महिलेचा मृत्यू झाला. अशी कोणावर वेळ येऊ नये मला वाटतं. आयव्हीएफ सेंटर चौकशीमध्ये येईल कारवाई तर होणार आहे. तांत्रिक बाबी तपासल्या पाहिजेत. घैसास यांचे आई वडील दोषी नाहीत असं म्हणणं आहे, असं त्यांनी सांगितले आहे.