India Squad For Tri Nation ODI Series : भारतात अजूनही आयपीएल 2025 चा थरार रंगला आहे. दरम्यान, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, स्मृती मानधना उपकर्णधार आहे. संघाची घोषणा करताना बीसीसीआयने सांगितले की, रेणुका सिंग आणि तीतस साधूला दुखापत झाली आहेत. दोन्ही खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नव्हते आणि म्हणूनच त्यांची निवड झाली नाही.
भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील त्रिकोणी एकदिवसीय मालिका 27 एप्रिलपासून श्रीलंकेत सुरू होणार आहे. प्रत्येक संघ 4-4 सामने खेळेल म्हणजेच प्रत्येक संघासोबत 2-2 सामने. भारताचा पहिला सामना 27 एप्रिल रोजी श्रीलंकेविरुद्ध होईल. यानंतर, दोन्ही संघ 4 मे रोजी दुसऱ्यांदा आमनेसामने येतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामने 29 एप्रिल आणि 7 मे रोजी खेळवले जातील. भारत आपले सर्व सामने कोलंबोमध्ये खेळेल. सर्व सामन्यांनंतर, 11 मे रोजी अव्वल 2 संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.
तिरंगी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काशवी गौतम, स्नेहा राणा, अरुंधती रेड्डी, तेजल हसबनीस, श्री चरणी, शुची उपाध्याय.
त्रिकोणी मालिकेतील भारतीय संघाचे वेळापत्रक
27 एप्रिल – भारत विरुद्ध श्रीलंका (कोलंबो)
29 एप्रिल – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलंबो)
4 मे – भारत विरुद्ध श्रीलंका (कोलंबो)
7 मे – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलंबो)
आयसीसी क्रमवारीत तिन्ही संघांचे स्थान
आयसीसी महिला एकदिवसीय संघ क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. संघाचे 112 रेटिंग गुण आहेत. दक्षिण आफ्रिका 103 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ 80 रेटिंग गुणांसह क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे.
हे ही वाचा –
MI vs RCB Hardik Pandya and Rohit Sharma: रोहित शर्माला जमत नसेल तर… वानखेडेवरील ‘फ्लॉप शो’नंतर रवी शास्त्रींनी हिटमॅनला झापलं
अधिक पाहा..