दीननाथ मंगेशकर हॉस्पिटल: पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर (Deenanath Mangeshkar Hospital) या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप केला जात आहे आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल (दि. 07) सादर झाला. त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. तर आज (दि. 08) माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येणार होता. मात्र आज हा अहवाल सादर होणार नाही, अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
दीनानाथ रुगणालय महिला मृत्यू प्रकरणाचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही, अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. या समितीकडून डॉक्टर आणि भिसे कुटुंबीयांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. या सगळ्यांकडून माहिती संकलित केलेली आहे. त्या माहितीच्या पडताळणीसाठी वेळ लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. दीनानाथ रुग्णालयासंदर्भातील निष्कर्ष आज ठरणार नाही. या प्रकरणी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल सादर झाला आणि त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. आता माता मृत्यू समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निष्कर्ष ठरवण्यात येणार आहे. आज हा अहवाल येणार होता. मात्र माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे दीनानाथ रुग्णालयासंदर्भातील निर्णय आज होणार नाही.
तसेच मिळकत कराच्या थकबाकीसाठी महापालिका मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवणार आहे. मंगेशकर रूग्णालय धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत असल्याने त्यानुसार मिळकत करामध्ये सवलत देण्याबाबत रुग्णालय न्यायालयात गेले आहे. त्यावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही किंवा कर वसुलीला स्थगिती दिलेली नाही. 22 कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडून रुग्णालयास नोटीस बजावण्यात येणार आहे. धर्मादाय कायद्यानुसार मिळकत करामध्ये सवलत द्यावी, या मागणीसाठी रूग्णालय प्रशासन 2017 मध्ये न्यायालयात गेले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच न्यायालयाने कर वसुलीला स्थगिती देखील दिलेली नाही.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात मेडिकल निगलिजन्स आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. या प्रकरणी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहीत पोलिसांनी स्पष्टीकरण मागितले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पुणे पोलिसांनी पत्र लिहिलं आहे. यात महिलेला 5.30 तास रुग्णालयात बसवून ठेवल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी ससूनला लेखी पत्र लिहित पोलिसांनी माहिती मागवली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी पत्रासोबत जोडली असल्याची माहिती समोर येत आहे.
https://www.youtube.com/watch?v=qltworvbj0k
आणखी वाचा
अधिक पाहा..