बांगलादेशातील दिनाजपुर येथे तलाव खणण्याचे काम बुलडोझर लावून केले जात असताना अचानक मातीतून भगवान विष्णूंची 27 किलोची मूर्ती हाती लागली आहे. या मूर्तीला बुलडोझरने खोदकाम सुरु असतानाही जराही हानी पोहचली नसल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. या मूर्तीत भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मी देखील आहे. ही मूर्ती आता पुरातत्व खात्याकडे सोपविण्यात आली आहे.
बांगलादेशातील दिनाजपूरात तलावाचे खोदकाम करताना जमीन खोलवर भगवान विष्णूंची 27 किलोची मूर्ती सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मूर्तीला पाहून सर्व मुसलमान आश्चर्यचकीत झाले आहे. त्यांनी या मूर्तीला सांभाळून तिला पुरातत्व विभागाच्या हवाली केले आहे. भगवान विष्णूची मूर्ती सापडण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधी देखील देशातील चार वेगवेगळ्या भागात भगवान विष्णूच्या मूर्ती सापडल्याच्या बातम्या आल्या आहेत. बांगलादेशातील वृत्तपत्र प्रथम ओलो यांच्यातील वृत्तानुसार दिनापुरच्या नवाबगंज परिसरात एका तलावाचे खोदकाम सुरु होते. त्यावेळी भगवान विष्णू यांची २९ इंची आणि १३ इंची रुंदीची मूर्ती सापडली होती.
तलावातून मुर्ती निघताच तलावाच्या आजूबाजूला गर्दी जमली. २७ किलो वजनाची ही मूर्ती भगवान विष्णूची असून त्यांच्या शेजारी माता लक्ष्मीची मूर्ती आहे. बुलडोझरने खोदकाम होऊनही या मुर्तीला कसलाही धक्का लागलेला नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार मूर्तीला ताब्यात घेऊन कोषागारात पाठवले आहे. तेथून ही मूर्ती पुरातत्व विभागाकडे पाठविली जाणार आहे. पुरातत्व विभाग या मूर्तीची कार्बन टेस्ट करुन ती कोणत्या सालातील आहे हे शोधून काढणार आहे. या आधी साल २०२३ मध्ये देखील बांगलादेशच्या फरीदपूरात देखील भगवान विष्णूंची मूर्ती सापडली होती.
या मूर्तीचे वजन ३२ किलोग्रॅम होते. ऑगस्ट २०२१ मध्ये बांगलादेशात भगवान विष्णूची १००० वर्षे जुनी मूर्ती सापडली होती, सध्या बांगलादेशात ज्या जागी भगवान विष्णूची मू्र्ती निघाली आहे तेथे आधी एक महाल होता. अनेक वर्षांपूर्वी हिंदू धर्माचे एक राजा येथे राहात होते. ते भगवान विष्णूचे भक्त होते. असे म्हटले जात आहे की महालातील मूर्ती तलावात गेली असावी. १९४७ आधी बांगलादेश भारताचा एक हिस्सा होते. साल १९४७ ते १९७१ ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले. त्याला पूर्व पाकिस्तान म्हटले जात होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तानने आक्रमण केल्याने झालेल्या युद्धात पाकची फाळणी स्वंतत्र बांगलादेशाची निर्मिती झाली.