गुंतवणूक योजना: एलआयसी (एलआयसी) प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध योजना चालवते. त्यापैकी एक योजना म्हणजे जीवन शिरोमणी (LIC Jeevan Shiromani Yojana). ही योजना अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे की, ज्यांचे उत्पन्न चांगले आहे. तसेच ज्यांना त्यांच्या गुंतवणुकीबाबत सुरक्षा हवी आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या जीवन शिरोमणी पॉलिसीमध्ये तुम्हाला फक्त 4 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. हा प्रीमियम खूप चांगला आहे. जीवन शिरोमणी 1 कोटी रुपयांच्या किमान विमा रकमेची हमी देते. कमाल विमा रकमेवर मर्यादा नाही. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
जीवन शिरोमणी पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. यामध्ये 4 वर्षांसाठी दरमहा 94,000 रुपये जमा करावे लागतील. तुम्ही हा प्रीमियम दरमहा, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक जमा करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकाचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. जर आपण कमाल वयाबद्दल बोललो तर, 14 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी कमाल वय 55 वर्षे आहे. 16 वर्षांच्या मुदतीसाठी कमाल वय 51 वर्षे आहे, 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय 48 वर्षे आहे आणि 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय 45 वर्षे आहे.
या पॉलिसीच्या एक वर्षानंतर आणि एक वर्षाचा संपूर्ण प्रीमियम भरल्यानंतर काही अटींसह कर्जाची सुविधाही दिली जाते. यासोबतच अन्य काही फायदेही दिले जातात. पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर आधारित ग्राहक कर्ज घेऊ शकतात. पॉलिसी कर्ज वेळोवेळी ठरवलेल्या व्याजदरावर उपलब्ध असेल. पॉलिसीधारकाला गंभीर आजाराचे निदान झाल्यास, त्याला विम्याच्या रकमेच्या 10 टक्के एकरकमी पेमेंट मिळते. याशिवाय पॉलिसीमध्ये मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांना काही फायदे समाविष्ट आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही https://licindia.in/ ला भेट देऊ शकता.
दरम्यान, ज्या लोकांना पैशांची मोठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणारी आहे. कारण चार वर्ष प्रमियम भरल्यानंतर त्यांना 1 कोटी रुपयांचा फायदा मिळणार आहे. एलआयसीच्या विविध योजना आहे. मात्र, अनेकांना या योजनेच्या संदर्भात माहिती नसते. एलआयसीच्या विविध योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यामुळं तुमची ठेवही सुरक्षीत राहते आणि तुम्हाला तुमच्या ठेवीवर चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळं एलआयसीच्या योजना फायदेशीर ठरतात.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..