उन्हाळ्यात घाम, धूळ आणि सनस्क्रीनमुळे चेहरा पटकन टॅन होतो. त्यामुळे सकाळी आणि रात्री, प्रथम ऑइल-बेस्ड क्लींझरने चेहरा स्वच्छ करा आणि नंतर हलकासा फेसवॉश वापरा. यामुळे त्वचेमधील अशुद्धता दूर होते आणि चेहरा तजेलदार राहतो.
त्वचेवरील मृत पेशी दूर करून ग्लो वाढवण्यासाठी सौम्य रासायनिक एक्सफोलिएंट (AHA, PHA) वापरा. यामुळे त्वचा चमकते आणि डाग कमी होतात.
चेहरा धुतल्यानंतर त्वचेला ओलावा देण्यासाठी हायड्रेटिंग टोनर किंवा एसन्स लावा. हायल्युरोनिक अॅसिड, तांदळाचे पाणी किंवा ग्रीन टी यासारख्या घटकांसह असे उत्पादने त्वचेला प्लंप आणि ताजं बनवतात.
उन्हाळ्यात भारी मॉइश्चरायझर टाळा. त्याऐवजी सेंटेला, नायसिनामाइड किंवा स्नेल म्युसिन असलेले जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. हे त्वचेला तेलकट न करता खोलवर हायड्रेट करतं.
सूर्यकिरणांपासून त्वचेला संरक्षण देण्यासाठी दररोज SPF 50+ सनस्क्रीन लावा. हे त्वचा काळवंडू देत नाही आणि सुरकुत्या, डाग यांपासूनही संरक्षण करतं.
त्वचेला दिवसभर ताजं ठेवण्यासाठी ग्रीन टी, गुलाबपाणी किंवा अॅलोवेरा युक्त फेस मिस्ट (Face Mist) वापरा. यामुळे त्वचेचा थकवा कमी होतो आणि फ्रेश लुक मिळतो.
दररोज भरपूर पाणी प्या आणि आहारात टरबूज, काकडी, संत्री यासारखी पाण्याची मात्रा जास्त असलेली फळं व भाज्या घ्या. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.