अखरेच्या क्षणी इम्पॅक्ट प्लेअर आयुष बदोनी याने केलेल्या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानात आयपीएलच्या 18 व्या मोसमात सलग तिसरा आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. लखनौने गुजरात टायटन्सवर 6 विकेट्सने धमाकेदार विजय साकारला. लखनौने यासह गुजरातला सलग पाचवा विजय मिळवण्यापासून पद्धतशीर रोखलं. गुजरातने लखनौला विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनौने हे आव्हान 3 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. लखनौने 19.3 ओव्हरमध्ये 186 रन्स केल्या.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान आणि रवी बिश्नोई.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर आणि मोहम्मद सिराज.