आयपीएल 2025 स्पर्धेच्या 27व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादकडे स्ट्राँग बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळेच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असावा, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. गेल्या काही सामन्यांमध्ये आपण प्रथम फलंदाजी केली आहे. त्यामुळे आपल्याकडे चांगल्या धावा मिळवण्याची क्षमता आहे. आपल्याला आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे, सध्या हीच आपली मानसिकता आहे. आपण पाहिले आहे की पॉवरप्लेमध्ये आपला रेकॉर्ड चांगला नाही. आपल्या मनात तो विचार नाही. आपल्या संघातील प्रत्येक खेळाडू आपापल्या पद्धतीने क्रिकेट खेळतो. आपल्याला अव्वल दर्जाचे असायला हवे, आपल्या प्रवृत्तीला पाठिंबा द्यायला हवा. आपल्याला ते वारंवार सांगत राहावे लागेल. त्याच संघासोबत खेळणार आहोत.’
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ठीक आहे. मला वाटतं आपण कोणत्याही धावांचा पाठलाग करू शकतो. ही सुरुवात आदर्श नाही. पण आपण खूप चांगला सराव करत आहोत. प्रत्येकजण चांगल्या स्थितीत आहे. आपण सलग काही गमावले आहेत, पण ते आदर्श नाही. संघात एक बदल केला आहे. कामिंदू मेंडिसऐवजी मलिंगाचा संघात समावेश आहे.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ 23 वेळा आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा वरचष्मा राहिला आहे. सनरायझर्स हैदराबादने 16, तर पंजाब किंग्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. या ठिकाणी या स्पर्धेत त्यांचा रेकॉर्डही चांगला आहे.राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. हैदराबादने घरच्या मैदानावर पंजाब किंग्सविरुद्ध फक्त 1 सामना गमावला आहे. तर 8 सामन्यात विजय मिळवला आहे.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, एशान मलिंगा.