गोपाल मोटाघरे, साम प्रतिनिधी
दोन मित्रांनी एकाच दिवशी आयुष्याचा शेवट केल्यानं पिंपरी चिंचवड हादरलंय. दोन्ही मित्रांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केलीय. दोघांनी एकाच दिवशी दोन्ही मित्रांनी आत्महत्या केल्याने पिंपरी चिंचवड शहरात मोठी खळबळ उडालीय. तुषार अशोक ढगे वय 25 वर्ष आणि सिकंदर सलाउद्दीन शेख आणि 30 वर्ष,अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत.
या घटनेप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मोशी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील भारत माता चौकाजवळील खिरीड वस्ती येथील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केलीय. तुषार अशोक ढगे आणि सिकंदर सलाउद्दीन शेख हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. काल मूळ गावावरून पुण्याला आले होते. पण आज त्या दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडालीय. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनेचा पंचामाना केला असून या घटनेचा चौकशी केली जात आहे.