'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी व समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रमानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगडावर आले होते.
रायगडावर अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार उदयनराजे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते.
यावेळी शाह यांच्यासोबत महायुतीतील नेत्यांनी किल्ले रायगड येथील ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली.
त्यानंतरच्या कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, "शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला तो रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे."
PM नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शिवाजी महाराज यांच्या आदर्शाची लढाई गौरवाने सुरू असल्याचंही ते म्हणाले.
तर शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका अशी हात जोडून विनंती करतो. देशासह जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
"या भूमीत जो कोणी येतो तो नवीन ऊर्जा घेऊन जातो, त्यामुळे प्रत्येक तरुणाने या प्रेरणा स्थळावर येऊन प्रेरणा घेतली पाहिजे", असंही ते म्हणाले.