भाजप आमदार नैनर नागेंद्रन यांची तामिळनाडू भाजप युनिटच्या अध्यक्षपदी निवड; माजी राज्य युनिट अध्यक्ष के अन्नामलाई यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Jalgaon Live : रावेर जिल्हा जळगांव येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, कापणीला आलेल्या केळीचे नुकसानरावेर जिल्हा जळगांव येथे दुपारी साडेचारच्या सुमारास १५ मिनिटे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, कापणीला आलेल्या केळीचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
DRDOचा गौरव! स्वदेशी ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणीSU-30 MKI विमानातून 1000 किलोग्रॅम वजनाच्या बॉम्बचे प्रक्षेपण करण्यात आले असून, हा बॉम्ब 100 किमी अंतरावर अचूकपणे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे.
Chh. Sambhajinagr : छत्रपती संभाजीनगरातून सराईत मोटरसायकल चोर अटकेत,20 वाहने जप्तछत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करत असताना गुन्हे शाखेला माहिती मिळाली की एकनाथ महादू मुंडे नावाचा आरोपी हा दुचाकी चोरी करत होता,त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने बनावट चावीचा वापर करून प्रोझोन मॉल परिसर आणि एमजीएम रुग्णालय परिसरातून एकूण 20 मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.या आरोपीला अटक करत सिडको पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे.
Pakistan Live: पाकिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचा धक्कापाकिस्तानमध्ये दुपारी १:०० वाजताच्या सुमारास भूंकपाचा धक्का जाणवला. हा ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का असल्याचे समजत आहे.
Nagpur Live: उमरेड एमआयडीसीमध्ये अल्युमिनियम फॉइल कंपनीत भीषण स्फोट, पाच जणांचा मृत्यूउमरेड एमआयडीसीमध्ये अल्युमिनियम फॉइल कंपनीत भीषण स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाल आहे. तसेच ४ जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
Pune Live : सिंहगडावर संतापजनक प्रकार ! परदेशी पर्यटकाला टवाळखोर तरुणांनी दिला त्रासपुण्यात सिंहगडावर संतापजनक प्रकार पाहायला मिळाला. सिंहगड पाहण्यासाठी आलेल्या परदेशी तरुणाला काही टवाळखोर मुलांनी त्रास दिला. त्याने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
Akola Live : अकोला जिल्ह्यामध्ये अकोला – मंगरुळपीर रस्त्यावर ट्रक उलटलाअकोला जिल्ह्यातील अकोला-मंगरुळपीर रस्त्यावर ट्रक उलटला. या ट्रकखाली पाच जणांचा दबून मृत्यु झाल्याची शक्यता आहे.
Live : : शाळा-अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंगआगामी काळात ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कारकेंद्रे असणाऱ्या अंगणवाड्या शाळा यांच्यात कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
Karad Live : कऱ्हाड- पाटणच्या २० पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट; दोन्ही तालुक्यांतील ३० मीटरपेक्षा मोठ्या पुलांचा समावेशकऱ्हाड- पाटण तालुक्यांतील तब्बल २० हून अधिक मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. त्यात पुलांची कार्यक्षमता तपासण्यात येणार आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी अशीच तपासणी झाली होती. त्या अहवालात बहुतेक पूल मजबुतीचा अहवाल दिला होता. त्यानंतर पुन्हा यंदा ३० मीटरपेक्षा मोठ्या पुलांची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास त्या पुलाचेही मजबुतीकरणाचे कामही हाेणार आहे.
Pune Live : जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकावर गोळीबारढोकळवाडी (वारक) येथे पुतण्या नवनाथ ढोकळे याने वडिलोपार्जित जमिनीवरील शेडच्या वादातून काका सोपान ढोकळे यांच्यावर गोळीबार केला.
गोळी कानामागून चाटल्याने ढोकळे गंभीर जखमी झाले असून, रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी आरोपी नवनाथला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Live : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकीजळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे.
सदर अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल पाठवून जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
या ईमेलमध्ये "जिल्हाधिकारी यांना जीवे मारू" असा थेट धमकीचा मजकूर असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने सदर ईमेल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे फॉरवर्ड केला असून, त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.
Devendra Fadnavis Live Updates: छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत. त्यांच्यामुळे देव, देश आणि धर्माचं काम करू शकतो -मुख्यमंत्री फडणवीसदेशातले राजे आणि रजवाडे संपत होते. परकीय आक्रमणाचं राज्य कधीच संपणार नाही असं वाटत होतं. कधीच पहाट होणार नाही असं वाटत होतं. तेव्हा छत्रपती शिवरायांसारखा तेजस्वी सूर्य उगवला. त्या सूर्याने स्वराज्याची पहाट दाखवली. छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत. त्यांच्यामुळे देव , देश आणि धर्माचं काम करू शकतो. छत्रपतींनी १८ पगड जातींच्या लोकांना एकत्र केलं - मुख्यमंत्री फडणवीस
Amit Shah Live Updates: स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील तेव्हा भारत जगात नंबर एक असेल - अमित शाहस्वातंत्र्याला १०० वर्षे होतील तेव्हा भारत जगात नंबर एक असेल. त्याची मूळ कल्पना शिवरायांनी मांडली. जिजाऊंनी बालशिवबांवर संस्कार केले. शिवरायांनी त्याला वटवृक्ष बनवलं. धर्मवीर संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, संताजी धनाजी यांनी लढा दिला.
शिवाजीनंतर औरंगजेब जोपर्यंत जिवंत राहिला तोपर्यंत या लोकांनी लढा दिला. स्वत:ला आलमगीर म्हणणाऱ्या औरंगजेबाची इथंच समाधी बनली. - अमित शाह
Udayanraje : शिवस्मारकाची घोषणा अमित शहा, फडणवीसांनी करावी : उदयनराजेछत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं अशी शिवप्रेमींची मागणी आहे. शिवस्मारकाची घोषणा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी रायगडावरील कार्यक्रमात केली.
Sangamner : आमदार आणि पोलिसांसमोर हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात ढोल वादनावरून राडासंगमनेरमध्ये हनुमान जयंतीच्या कार्यक्रमावेळी राडा झाला आहे. आमदार आणि पोलिसांसमोरच दोन गटात झालेल्या राड्याची चर्चा होत आहे. आयोजक आणि ढोल वादक आमने सामने आले होते.
Amit Shah On Raigad : अमित शहा रायगडवर पोहोचले, छत्रपती शिवाजी महाराजांना केलं अभिवादनकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडावर दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ते अभिवादन करणार आहेत. अमित शहा पुण्याहून हेलिकॉप्टरने रायगडच्या पायथ्याला दाखल झाले. तिथून रोपवेनं ते रायगडावर पोहोचलेत.
Akola Truck Accident : अकोल्यात भीषण अपघात,पाच जणांचा मृत्यूअकोल्यात वीटांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रक दुचाकींवर कोसळला असून या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ट्रकमधील चौघांचा समावेश आहे. तर इतर दोघे जखमी झाल्याची माहिती समजते.
शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथिनिमित्त अमित शाहा रायगडावर दाखलशिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथिनिमित्त अमित शाहा रायगडावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात रोपवेन रायगडावर दाखल होतील.
MPSC च्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेटएमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात शरद पवारांची भेट घेतली.
- काल रात्री विद्यार्थ्यांनी पुण्यात केलं होतं अचानक आंदोलन
- रात्रीच्या आंदोलनानंतर आज सकाळी विद्यार्थी त्यांच्या मागण्या घेऊन शरद पवारांच्या भेटीला
- शरद पवारांसोबत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अर्ध्या तास केली चर्चा
- शरद पवारांचा विद्यार्थ्यां समोरूनच MPSC आयोगाच्या अध्यक्षांना फोन
- शरद पवारांनी रजनीश शेठ यांच्याशी फोनवरून केली चर्चा
- रजनीश शेठ यांनी विद्यार्थ्यांना दिली भेटीची वेळ
- MPSC विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू रजनीश शेठ यांच्याकडून शरद पवारांना फोनवरून माहिती
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार?रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार?
Desh Live : देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अमित शहांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छाकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "श्री हनुमान जयंतीच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. सर्व संकटांचे निवारण करणारे भगवान बजरंगबली सर्व संकटे दूर करोत आणि शक्ती, बुद्धी, विवेक आणि दीर्घायुष्य प्रदान करोत. जय श्री राम."
LMumbai Live : मुंबईतील पाणीप्रश्नी सोडविण्यासाठी आदित्य ठाकरेंचा 48 तासांचा अल्टिमेटममुंबईतील पाणी प्रश्नासाठी आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी 48 तासांत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. पाणी प्रश्न न सुटल्यास मुंबईतील प्रत्येक वार्ड कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Pune Live : डॉ. सुश्रुत घैसास यांना ‘एमएमसी’ची नोटीसमहाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना गुरुवारी नोटीस बजावली. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे.
Maharashtra Live : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यताहवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढले चार दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तर हिंगोली जिल्ह्याला ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा दिला असून, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या भागांमध्ये पुढच्या 48 तासांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Gold Price LIVE : सोन्याचा भाव विक्रमी ९६ हजारांवर; ऑल इंडिया सराफ असोसिएशनची माहितीनवी दिल्ली : स्थानिक ज्वेलर आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ६,२५० रुपयांनी वाढून विक्रमी ९६,४५० रुपयांवर पोहोचला, अशी माहिती ऑल इंडिया सराफ असोसिएशनने दिली आहे.
Shivaji University Exam : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नऊ महाविद्यालयांमधील परीक्षा रद्द करण्याचा निर्णयकोल्हापूर : पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक, प्रश्नपत्रिका शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ देणार असून उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम महाविद्यालय (कॉलेज) करणार आहेत. त्याबाबतचा निर्णय आज विद्यापीठ विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नऊ महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय यावेळी झाला.
Kolhapur News : शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामाकोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील आणि उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांनी आपला पदाचा राजीनामा दिला. संघाच्या कार्यकारी संचालकांकडे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. काल जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीनंतर त्यांना राजीनामा देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान, नवीन अध्यक्षपदासाठी आमदार विनय कोरे यांच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी कोरे यांच्या माध्यमातून शेतकरी संघात आलेल्या अमर माने, बाबासाहेब शिंदे, प्रधान पाटील, श्री. जामदार व श्री. चौगले यांच्यापैकी विचार केला जाऊ शकतो. तसेच, याबाबत सर्व नेत्यांची भूमिका काय असणार यावरही पुढील दिशा अवलंबून आहे.
Waqf Amendment Act : पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने; अनेक वाहने जाळलीपश्चिम बंगाल : मुर्शिदाबादच्या जांगीपूर येथे काही लोकांनी वक्फ सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने केली. अनेक वाहने जाळण्यात आली आहेत. बंगाल पोलिसांच्या माहितीनुसार, "जांगीपूरच्या सुती आणि समसेरगंज भागातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे."
कोल्हापूर : जोतिबा डोंगरावर सासनकाठी नाचविताना भाविकाच्या हातातून सुटल्याने ती बाजूच्या एका महिला होमगार्डच्या डोक्यावर आदळली. दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या प्रकारात आशाराणी मारुती पाटील (वय ४५, रा. शाहूवाडी) जखमी झाल्या. त्या बंदोबस्ताला सेक्टरजवळ तैनात होत्या. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
Radhanagari to Dajipur Route : दाजीपूर मार्गावर ३० एप्रिलपर्यंत दिवसा वाहतुकीस परवानगीकोल्हापूर : राधानगरी ते दाजीपूर मार्गावर ३० एप्रिलपर्यंत दिवसा वाहतुकीस परवानगी दिली आहे. जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी पाच मार्च २०२५ च्या अधिसूचनेमध्ये दुरुस्ती करून ३० एप्रिल २०२५ पर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस व अत्यावश्यक सेवेसाठी ॲम्ब्युलन्सला फक्त दिवसा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. राधानगरी- दाजीपूर रस्त्याच्या बाजूला न्यू करंजे, राऊतवाडी, मांडरेवाडी, शेळप, बांबर, सतिचामाळ व हसणेअंतर्गत गावे असल्याने या गावातील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी राधानगरी- दाजीपूर हा एकमेव मार्ग आहे.
Jyotiba Chaitra Yatra LIVE : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवसजोतिबा डोंगर : येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. १२) मुख्य दिवस आहे. त्यानिमित्ताने ‘चांगभलं’चा गजर दुमदुमणार आहे. यात्रेनिमित्त प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.
Madhur Bajaj Passes Away : उद्योगपती मधुर बजाज यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासमुंबई : बजाज ऑटोचे बिगर कार्यकारी संचालक आणि माजी उपाध्यक्ष मधुर बजाज (वय ७३) यांचे येथील ब्रीच कँडी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटकाही आला होता. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Tahawwur Rana LIVE : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाची NIA कडून चौकशी सुरुLatest Marathi Live Updates 12 April 2025 : जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. १२) मुख्य दिवस आहे. त्यानिमित्ताने ‘चांगभलं’चा गजर दुमदुमणार आहे. तसेच तमिळनाडूतील विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी (२०२६) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्या युतीची घोषणा केलीये. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याच्या चौकशीला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सुरुवात केली आहे. आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ६,२५० रुपयांनी वाढून विक्रमी ९६,४५० रुपयांवर पोहचला, अशी माहिती ऑल इंडिया सराफ असोसिएशनने दिली आहे. बजाज ऑटोचे बिगर कार्यकारी संचालक आणि माजी उपाध्यक्ष मधुर बजाज (वय ७३) यांचे येथील ब्रीच कँडी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून काही भागांत पाऊस पडत असून पिकांचे नुकसान होत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..