IPL 2025 RR vs RCB Live Streaming : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमेसामने, कोण करणार कमबॅक?
GH News April 13, 2025 03:06 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 28 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने भिडणार आहेत. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर संजू सॅमसन याच्याकडे राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील सहावा सामना आहे. दोन्ही संघांनी शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे या दोन्ही संघांचा हा सामना जिंकून कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानात हा सामना होणार आहे. त्यामुळे राजस्थानला घरच्या परिस्थितीचा किती फायदा होतो? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना केव्हा?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना रविवारी 13 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु लाईव्ह सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.

राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, संजू सॅमसन, कुणाल सिंग राठौर, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंग चरक, अशोक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.