नाशिकमध्ये भयंकर प्रकार, तडीपार गुंडाकडून धावत्या बसला रिक्षा आडवी घालत नग्न होऊन महिलेचा विनयभ
Marathi April 13, 2025 05:24 PM

नाशिक गुन्हा: नाशिकमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे.  रिक्षा चालकाने भररस्त्यात नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून तो शहरातून तडीपार असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोधले नगर परिसरातून सिटीलिंकची बस येताना ती अचानक बंद पडली. यामुळे बसमधील प्रवासी दुसऱ्या बसची वाट पाहत खाली उतरले. त्यावेळी एक रिक्षाचालक प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी विचारणा करण्यासाठी आला होता. त्याने फिर्यादी महिलेला विचारले की, तुमको किधर जाना है, यावेळी महिलेने रिक्षा चालकाला नकार दिला. यानंतर महिला बसची वाट बघत असता संशयिताने तुमको किधर जाना है, असे म्हणत हाताने अश्लील इशारे केले.

नग्न होत अश्लील हावभाव करत केला महिलेचा विनयभंग

यानंतर महिला घाबरून गेली होती. काही वेळाने सिटीलिंकची बस तेथे आल्याने प्रवासी बसमध्ये बसले. बस द्वारकेच्या दिशेने निघाली असता रिक्षाचालक तिचा पाठलाग करत आहे, असे महिलेला जाणवले. द्वारका सर्कल येथे सिटीलिंक बस आली असता रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राने रिक्षा बसला आडवी लावली. यानंतर रिक्षाचालकाने कपडे काढून तो नग्न झाला.

संशयित आरोपी तडीपार

त्याने सिटीलिंक बस चालक आणि वाहकाला देखील मारहाण केली. तसेच बसवर दगड फेकत बसच्या काचादेखील फोडल्या. यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपींना ताब्यात घेतले. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख हा भद्रकाली, जुने नाशिक या परिसरात राहणारा आहे. यापूर्वी त्याच्यावर एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. 16 ऑगस्ट रोजी दंगलीतील तो आरोपी आहे. त्याला शहरातून तडीपार करण्यात आलेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संशयित आरोपीकडे असलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : भांडण सोडवणं पडलं महागात, टोळक्याकडून रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार, उपचारादरम्यान मृत्यू, नाशिकमध्ये घटनेनं खळबळ

Vishal Gawali Kalyan Crime: विशाल गवळीने आत्महत्या केली नाही, तुरुंगात त्याची हत्या झालेय; वकिलांचा खळबळजनक दावा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.