Health Tips : बीपी वाढवतात या सवयी
Marathi April 14, 2025 09:25 AM

उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर ही एक अशी समस्या आहे जी वेगाने पसरत चालली आहे. वाढलेल्या रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी होणे असे अनेक आजार होऊ शकतात. म्हणून, उच्च रक्तदाबाची समस्या टाळणे महत्वाचे आहे. सामान्यतः लोकांना असे वाटत असते की जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि तो नियंत्रित करण्यासाठी ते मिठाचे सेवन कमी करतात. मात्र रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ इतकेच करणे पुरेसे नाही.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, इतर काही सवयी सुधारणे देखील आवश्यक आहे. जाणून घेऊयात त्या सवयी नेमक्या कोणत्या याविषयी.

उच्च रक्तदाब निर्माण करणाऱ्या सवयी

शारीरिक निष्क्रियता

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमध्ये बहुतेक लोक तासन्तास एकाच ठिकाणी बसून काम करतात. शारीरिक हालचालींचा अभाव लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाचा धोका वाढवतो. नियमित व्यायामाचा अभाव रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी करतो, ज्यामुळे रक्ताभिसरणातील दाब वाढतो. परिणामी हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते.

काय करायचं?

दररोज किमान 30 मिनिटे जलद चालणे, योगा किंवा एरोबिक्स करा .
जास्त वेळ बसणे टाळा आणि दर तासाला 5 मिनिटांचा ब्रेक घ्या.

ताण घेणे

आरोग्य टिप्स: या सवयी बीपी वाढवतात

ताण आणि चिंता यांचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीरात कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालाईन हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे हार्ट रेट आणि रक्तदाब वाढतो . जास्त काळ तणावाखाली राहिल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

काय करायचं?

ध्यानधारणा करा, खोल श्वास घ्या आणि 7-8 तास झोप घ्या.
संगीत, चित्रकला किंवा बागकाम यासारखे तुमच्या आवडीचे कोणतेही छंद जोपासा.

झोपेचा अभाव

आरोग्य टिप्स: या सवयी बीपी वाढवतात

कमी झोपणे किंवा पुरेशी झोप न घेणे देखील उच्च रक्तदाबाचे कारण बनू शकते. झोपेचा अभाव शरीराचा ताण वाढवतो आणि हार्मोनल असंतुलन निर्माण करतो, ज्यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो.

काय करायचं?

दररोज 7-8 तासांची चांगली झोप घ्या.
झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल आणि टीव्ही वापरू नका.

दारू आणि धूम्रपान

आरोग्य टिप्स: या सवयी बीपी वाढवतात

जास्त मद्यपान आणि धूम्रपान दोन्हीमुळे रक्तदाब वाढतो. अल्कोहोलमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाचे ठोके वाढतात. त्याच वेळी, सिगारेटमध्ये असलेले निकोटीन धमन्या कडक करते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

काय करायचं?

दारू पिणे पूर्णपणे बंद करा.
धूम्रपानापासून दूर राहा आणि जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणे

आरोग्य टिप्स: या सवयी बीपी वाढवतात

मिठाव्यतिरिक्त, प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये साखर, ट्रान्स फॅट्स आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, जे वजन वाढवतात आणि कोलेस्टेरॉलवर परिणाम करून रक्तदाब वाढवतात.

काय करायचं?

तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या, धान्य आणि प्रथिने समाविष्ट करा.
पॅक केलेले अन्न, कोल्ड्रिंक्स आणि फास्ट फूड टाळा.

हेही वाचा : Sai Tamhankar : स्टाईल आयकॉन सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.