Bor Ghat Amrutanjan Bridge Mumbai-Pune highway accident : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोर घाटात अमृतांजन पूलाजवळ रविवारी रात्री ११ वाजता ६ वाहनाचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रकने पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ४ जण गंभीर आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली.
बोर घाटातील अमृतांजन पूलाजवळ तीव्र उतारावर मालवाहू ट्रक चालकाचे संतुलन सुटले. ट्रकने एकापाठोपाठ एक पाच वाहनांना धडक दिली. यामध्ये बाप-लेकीचा जागेवरच मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे परिसरात पसरली आहे. घाटरस्त्यावरील तीव्र उतार आणि ट्रकच्या अति वेगामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बोर घाटात झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली आणि वाहतूक पूर्वपदावर आणली.
अपघातामधील जखमींना पनवेल, खोपोली आणि येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरू केला. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला. या अपघाताने बोर घाटातील रस्त्याच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.