आयपीएल 2025 स्पर्धेतील 30 वा सामना आज (14 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघामध्ये खेळला गेला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाने 5 विकेट्सने जिंकला आहे. चेन्नईचा हा स्पर्धेतील दुसरा विजय आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि लखनऊ संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. लखनऊने प्रथम फलंदाजी करत 7 खेळाडू गमावून 166 धावा केल्या तसेच चेन्नईला जिंकण्यासाठी 167 धावांचं आव्हान दिलं होतं.
धावांचा पाठलाग करताना चेन्नई ची सुरुवात जोरदार झाली. प्रथम शेख रशीद आणि रचिन रवींद्र यांनी 50 धावांची चांगली भागीदारी रचली. रशीदने 19 चेंडू 27 धावा करत 6 चौकार झळकावले. तसेच रचिनने 37 धावा केल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज महेंद्रसिंग धोनीने चेन्नईच्या विजयात महत्त्वाची कामगिरी निभावली. शिवम दुबे आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चेन्नईचा विजय निश्चित केला. शिवम दुबेने 37 चेंडूत 43 धावा केल्या. तसेच महेंद्रसिंग धोनीने 11 चेंडूत 26 धावा केल्या त्याने 4 चौकार तसेच 1 षटकार झळकावला.
लखनऊसाठी प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक धावा कर्णधार ऋषभ पंतने केल्या, त्याने 49 चेंडूत 63 धावा करत चार षटकार तसेच चार चौकार झळकावले.
चेन्नईसाठी गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा आणि तीन षटकात 24 धावा देत दोन विकेट्स पटकावल्या तसेच. मथीशा पथीरानाने 2 विकेट्स घेतल्या.
चेन्नईने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. पाच पराभवानंतर चेन्नईने या हंगामात दुसरा विजय मिळवलेला आहे.