एकेनाथ शिंदे अमरावती: राज्यात 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) काळात अनेक विकास कामे झाली. मात्र मधल्या काळात अचानक आलेल्या सरकारने पुन्हा काम बंद करण्याचे काम झालं. पण 2022 साली तुमच्या मनातलं महायुतीचं सरकार आलं, तेव्हा पुन्हा या विकासकामांना गती मिळाली. त्यामुळे अतिशय कमी वेळात आपण अमरावती येथील विमानतळाचे (Amravati Airport Inauguration) काम खऱ्या अर्थाने सुरू करू शकलो. महायुतीचे सरकार येण्यापूर्वी आपण पाहिलं की अनेक महत्त्वपूर्ण योजना बंद पडल्या होत्या, विकास काम ठप्प झालं होतं आणि विकास आणि कल्याणकारी योजणांचं टेक ऑफ झालं. मात्र त्यानंतर विमानाचा पायलट मी होतो आणि को- पायलट देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा (Ajit Pawar) होते. मात्र आता देवेंद्रजी पायलट आहे आणि आम्ही दोघे को पायालट असल्याची मिश्किल प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. अमरावती येथे विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पायलटची सीट बदलली तरी विकासाचा विमान हे कायम तेच आहे आणि आम्ही त्याच गतीने समोर जात आहोत. कारण आमचे इंजिन तेच आहे. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई समृद्धी महामार्गचे लोकार्पण होतं असताना अनेकांनी या विकास कामाला विरोध केला. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते. तर मी त्या विभागाचा मंत्री म्हणून काम पाहिलं. अनेकांनी विकास विरोधी भूमिका घेतली. मात्र आम्ही ते काम करून हा महामार्ग विकासाचा महामार्ग असल्याचे सिद्ध करून दाखवलं. असेही शिंदे म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या वेळी देवेंद्र फडणवीसांची नेतृत्वात मी रस्त्यावर उतरून काम केलं आणि काम करून दखवले. मुंबईतील कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल, नव्या मुंबईतील विमानतळ असेल असे अनेक विकासकामे आम्ही गेल्या अडीच वर्ष्याचा काळात मार्गी लावले आहे. समृद्धी महामार्गात काही लोकांनी आळमुठी भूमिका घेतली. आधी चे लोक सत्तेत होते त्यांना केवळ अडचणीचा पाढा पाठ होता, विकासाचा पाढा त्यांना पाठ नव्हता. विरोधक अफवा पसरवत आहे, पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. टप्याटप्यामध्ये सर्व योजना सुरू करू. पेपर मिस्टिकवालं आमचं सरकार नाही. हे डबल इंजिन सरकार आहे. गेल्या 10 वर्षात 86 विमानतळ झाली असून आगामी काळात मोदीजींच्या मार्गदर्शनात अजून काम आम्हाला करता येणार आहे. आम्हाला पालघर येथे ही नवं विमानातळ करत असल्याची घोषणा ही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..