महाराष्ट्रातील सर्वात राजकीय बातमी हाती आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंसोबत पहिल्यांदा भेट झाली. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे दोघांच्या राजकीय भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. दोघांच्या भेटीमागचं कारण समोर आलं आहे. राज्यातील दोन दिग्गज नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' निवासस्थानी दाखल झाले. राज ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट महत्वाची मानली जात आहे. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
राज ठाकरेंच्या भेटीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, 'आज खरं म्हणजे मला राज ठाकरेंनी स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं. त्यासाठी मी आलो होतो. निवडणुका झाल्यानंतर गेल्या एक दोन महिन्यांपासून भेटायचं, एकत्र जेवुया. असं आमचं सुरु होतं. ही सदिच्छा भेट होती. यामुळे चांगली भेट झाली. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ही आमची सदिच्छा भेट होती. यात राजकीय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही'.
'रस्त्यावरून विचारणा झाली. विकासाची चर्चा झाली. बाळासाहेबांच्या आवठणीवर गप्पा झाल्या. आम्ही पोटात एक आणि ओठात असं ठेवणार नाही. आम्ही त्या काळात एकत्र काम केलं आहे. बाळासाहेबांच्या जास्त आठवणी माझ्यापेक्षा राज ठाकरेंकडे आहे. खूप चांगली भेट झाली. मला वाटतं, यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढण्यात अर्थ काढू नये', असे पुढे म्हणाले.