Tragic Accident : दाळ मिल मशीन अंगावर पडून ३ मजुरांचा मृत्यू; यवतमाळमधील धक्कादायक घटना
Saam TV April 16, 2025 11:45 PM

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ शहरात तीन मजुरांचा दाळ मिल मशील पडून मृत्यू झाला आहे. यवतमाळ शहरातील एमआयडीसी परिसरातील दाळ मिल मशीनमधील स्टोरेज अंगावर पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. जैन दाल मिल लोहारा येथील ही घटना आहे. अंगावर मशीन पडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

यवतमाळच्या एमआयडीसी परिसरात धक्कादायक घटना घडली. दाळ मिल मशीन मजुरांच्या अंगावर पडून मोठा अनर्थ घडला. लोहारा परिसरात घडलेल्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. यवतमाळ एमआयडीसी परिसरात झालेल्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांमध्ये दोघे मजूर मध्य प्रदेशातील आहेत. तर एक मजूर वर्धा येथील असल्याची माहिती मिळत आहे. तिघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यवतळमाळ घडलेल्या दूर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे.

विजेचा झटका लागून शेतकऱ्याचा मृत्यू

सोलापुरात विजेचा झटका लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील घटना आहे. गेल्या 3 तासांपासून शेतकऱ्याचा मृतदेह महावितरणच्या कार्यालयाबाहेर ठेवण्यात आला आहे.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ३० वर्षीय मनोज डंके यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजेच्या झटक्याने एकाच मृत्यू तर इतर दोन जखमी झाले आहेत. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिस आणि आमदार राजू खरे घटनास्थळी पोहोचले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.