Maharashtra News Live Updates: साडे चार वर्षानंतर हत्या करणारा आरोपी अटक, दुकानात गाडून ठेवलेले मृतदेहाचे अवशेष ताब्यात
Saam TV April 17, 2025 12:45 AM
साडे चार वर्षानंतर हत्या करणारा आरोपी अटक, दुकानात गाडून ठेवलेले मृतदेहाचे अवशेष ताब्यात

भिवंडी शहरातील नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानात गाडून ठेवणाऱ्या हत्या करणाऱ्यास ठाणे गुन्हा शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक करीत घटनास्थळा वरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले आहेत.गुलाम रब्बानी असे अटक केलेल्या मौलवीचे नाव असून शोएब शेख वय १७ असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

अमरावती जिल्ह्यत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बरसला जोरदार पाऊस

कांदा,संत्रा,पिकाला बसणार फटका.....

अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची उडाली तारांबळ.....

उकाळ्या पासून जनतेला मिळाला दिलासा....

पुण्यात रिक्षाचालकांना गणवेश ओळखपत्र बंधनकारक

पुणे आरटीओने काढले पात्र

पांढरा शर्ट,खाकी पँट परिधान करा अन्यथा होणार कारवाई होणार

पुणे आरटीओने काढले पत्र

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

काही स्वाभिमानीचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्याच्या गाडीसमोर जाण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतला ताब्यात

बाबासाहेब आगे हत्या प्रकरणातील आरोपी नारायण फपाळला 3 दिवसांची पोलीस कोठडी

माजलगाव येथील भाजपा लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांची भाजपा कार्यालयासमोर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती याप्रकरणी आरोपी नारायण फापाळ स्वतः माजलगाव शहर पोलिसांना शरण गेला होता यानंतर त्याला आज माजलगावच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये माजलगाव पोलिसांनी हजर केले होते वकिलांच्या युक्तिवादानंतर आरोपी नारायण फपाळ ला तीन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे.

नंदूरबारच्या मोड-खरवड रस्त्यावरील पूल धोकादायक स्थितीत, तातडीने दुरुस्तीची मागणी

तळोदा तालुक्यातील मोड-खरवड रस्त्यावर मोड गावाजवळ असलेल्या निजरा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 1 कोटी 92 लाख 75 हजार रुपये खर्चून बांधलेल्या या पुलाच्या स्लॅपमधील सळ्या गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे बाहेर आल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.12 महिन्यांच्या मुदतीत या पुलाचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, आता पुलाची दुर्दशा झाली असून मोटरसायकल चालकांसाठी हा मार्ग विशेष धोकादायक बनला आहे.

मोड आणि खरवडच्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तातडीने या पुलाचे ऑडिट करून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती न केल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

कल्याणजवळील म्हारळ गावातील धक्कादायक घटना, गॅरेज सुरू केल्याच्या वादातून दोन भावांना बेदम मारहाण

कल्याण : गॅरेजमध्ये मॅकेनिक म्हणून काम करणाऱ्या कर्मचारी अनिकेत व्यास याला मालकाने किरकोळ वादातून कामावरून काढले. यानंतर या मॅकेनिकने मालकाच्या गॅरेजच्याच शेजारी स्वतःचे गॅरेज थाटले .त्यामुळे गॅरेज मालक आणि मॅकेनिक मध्ये वाद झाला .या वादातून गॅरेज मालकासह त्याच्या साथीदारांनी थेट काम मॅकेनिक अनिकेतचे घर गाठत अनिकेत सह त्याच्या भावाला लोखंडी सळई ने बेदम मारहाण केली .हा संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे .या प्रकरणी जखमी आशुतोष व्यास याच्या तक्रारीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आरोपी सतीश पिल्लई याच्यासह चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मनसेला मोठा धक्का

पुणे शहर मनसेचे उपाध्यक्ष,युवा उद्योजक आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काल शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

संदीप मोहिते पाटील यांच्याबरोबर इतर काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा हातात घेतलाय.

पुढील काळात होणाऱ्या बहुप्रतिक्षित पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

काही दिवसापूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता संदीप मोहिते पाटील यांनी मनसे मधुन शिंदे याच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटी सानुग्रह अनुदान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होतं आहे सानुग्राह अनुदान वितरण

- 2006 ते 2013 दरम्यान सिंचन प्रकल्पासाठी सरळ खरेदी, अखेर शेतकऱ्यांना शासनाकडून 831 सानुग्रह अनुदान..

- अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात विदर्भातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते दिले जाणार अनुदान.

- शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 5 लाखांचे अनुदान..

- पश्चिम विदर्भातील 14,149 हेक्टर भूमी देणाऱ्या बाधितांना 700 कोटी,तर पूर्व विदर्भाच्या वाट्याला 2484.20 हेक्टर करिता 124 कोटी देण्यात येणार..

- अनेक आंदोलनानतंर शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर यश

- विदर्भातील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

- सर्वाधिक भूसंपादन शेती अमरावती जिल्ह्यात....

Mumbai News: महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अंधेरीत ईडीची धाड

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अंधेरीत ईडीची धाड

अंधेरी पूर्वेकडील तेली गल्लीत असलेल्या हॉटेल इम्प्रियल पॅलेस येथील पाचव्या मजल्यावर ईडीची कारवाई

हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या बालू फोर्जिंग कंपनीच्या कार्यालयावर ईडीची रेड सुरू आहे

मागील 5 तासांपासून या ठिकाणी ईडी ची रेड सुरू

या कंपनीकडून 2300 कोटीचा घोटाळा झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Amravati News: राणा दाम्पत्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती शहरात जंगी स्वागत

अमरावती -

राणा दाम्पत्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती शहरात जंगी स्वागत

आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं भल्या मोठ्या हाराने देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

अमरावती विमानतळ सुरु केल्याने राणा दाम्पत्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार....

Pune News: कोंढव्यात कोयताधारी युवकांकडून वाहनांची तोडफोड

पुणे -

- कोंढव्यात कोयताधारी युवकांकडून वाहनांची तोडफोड

- कोंढवा परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात कोयताधारी टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला.

- ⁠टोळक्याने हातात कोयते व हत्यारे घेऊन परिसरातील वाहनांची तोडफोड केली.

- ⁠या घटनेत ९ दुचाकी, २ रिक्षा आणि १ चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Baramati News: उजनी धरणाची वाटचाल मृत पाणी साठ्याकडे

बारामती - उजनी धरणाची वाटचाल मृत पाणी साठ्याकडे

पुढील दोन दिवसांत उजनी धरण मायनसमध्ये जाणार

उजनी धरणात केवळ 2 टीएमसीच जिवंत पाणीसाठा

सध्या उजनीत एकूण साठवण क्षमतेच्या 65 टीएमसी पाणी

मंत्री उदय सामंत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात भेट

राज्याचे उद्योग मंत्री आज बीड जिल्हा दौऱ्यावरती होते त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे देखील उपस्थित होते. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली. यावेळी सरकारने दिलेले आश्वासन त्याचबरोबर काही महत्त्वाच्या मागण्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मिळणार मोफत प्रसाद

तिरूपती बालजीच्या धर्तीवर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणार्या भाविकांना मोफत प्रसाद देण्यात येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शना नंतर भाविकांना प्रसाद देण्यात यावा अशी मागणी होती. त्यानुसार येत्या काही दिवसांत भाविकांना दर्शन झाले नंतर लाडू प्रसाद मोफत देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या नंतर आषाढी वारीच्या निमित्ताने मोफत प्रसाद देण्यात येईल अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

आदित्य ठाकरेअंगलट आलं म्हणून भाजपने औरंगजेबाचा विषय बंद पाडला जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रसचे आंदोलन

जळगावात राष्ट्रवादी युवक शरद पवार गटाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर बसून रस्ता रोको करत आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नसल्याने केंद्र सरकारचा राष्ट्रवादी युवक तर्फे निषेध व्यक्त करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली.

डॉ घैसासांना आयएमएचा पाठिंबा, अमित गोरखे म्हणाले...!

तनीषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयचे डॉ सुश्रुत घैसास नाहीत. असं म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ घैसासांना पाठिंबा दर्शवलाय. मात्र ही बाब खेदजनक असून डॉ घैसास प्रमाणे आयएमएला रोषाला सामोरं जावं लागणार आहे. असं म्हणत भाजपचे आमदार अमित गोरखेंनी आयएमएचे अध्यक्ष संतोष कदामांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. मुळात कदमांनी या प्रकरणात बोलायला नको होतं. मात्र त्यांच्या या भूमिकेने संबंध डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, असं गोरखेंनी नमूद केलं. दुसरीकडे चौथा अहवाल रात्री मुख्यमंत्र्यांकडे सादर झाल्याचा दावा, गोरखेंनी केलाय. यात तनीषा भिसेंना न्याय मिळेल, असा विश्वास गोरखेंनी व्यक्त केलाय.

Nashik Latest News Update : अनधिकृत बांधकाम पाडण्याची नाशिक महापालिकेची कारवाई संपली

नाशिकमधील अनधिकृत बांधकाम पाडण्याची महापालिकेची कारवाई संपली. अनधिकृत बांधकाम आणि मलबा पूर्णपणे हटवून महापालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथक माघारी परतलेय.

Maharashtra News Live Updates : सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या जामीन अर्जावर शिरूर न्यायालयात सुनावणी

आरोपी सतीश भोसले विरोधामध्ये शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत त्यापैकी वन विभागाचा एक गुन्हा दाखल आहे वनविभागाच्या न्यायालय कस्टडीमध्ये असताना सतीश भोसले कडून जमिनीसाठी अर्ज करण्यात आला आहे.

विजय वडेट्टीवारएक दिवस आमचा येईल आणि शहरात शांततेचे पाईक म्हणून ओळखू पुण्यात एमपीएससीच्या मुलांचं पुन्हा आंदोलन

पुण्यात एमपीएससीच्या मुलांनी पुन्हा आंदोलन पुकारले आहे. दोन मागण्यांसाठी एमपीएससी विद्यार्थ्यांकडून पुन्हा आंदोलनाचा पवित्रा. एमपीएससीचे विद्यार्थ्यांचे राज्य सेवेच्या मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी आंदोलन सुरू आहे. आंदोलन ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

कागलचे राजकारण तापले, समरजीतसिंह घाटगेंना ठाकरेंची ऑफर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीतसिंह घाटगे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कागलच्या राजकारणात समरजीत सिंह घाटगे यांचा मोलाचा वाटा आहे. हसन मुश्रीफ आणि संजय बाबा घाटगे यांच्या राजकारणाचा फटका कागल तालुक्याला बसलाय. समरजीत सिंह घाटगे यांना पुन्हा उभारी देण्यासाठी मी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते संजय पवार यांनी साम टीव्हीला दिली.

Maharashtra News Live Updates : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरास सुरुवात

- ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत पहिले सत्र सुरू झाले. आम्ही इथेच या चर्चासत्राला सुरुवात झाली. संजय राऊत खासदार राजन विचारे, राजाभाऊ वाजे यांची मुलाखत घेत आहे.

हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्षमोदी सरकार सत्ते देऊन अकरा वर्षे झाले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात त्यांच्या हातात कुठली अनियमित्ता सापडलेली नाही. नॅशनल हेरॉल्ड मध्ये यात संचालकला मानधन मिळत नाही किंवा यात विकण्याचा अधिकार नाही. नॉन प्रॉफिट कंपनी असल्यामुळे शेअर होल्डरला याचा लाभ मिळत नाही. ही कंपनी अवसानात गेल्यावर याची सगळी प्रॉपर्टी सरकार जमा होईल. एवढ्यात कुठली अनियमित्ता होण्याची शक्यता नाही त्यामुळे राहुल गांधींना भीत आहेत. अनिल नवगणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांनी मुंबईत मुक्तागिरी बंगल्यावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या वेळी त्यांचा सोबत अनेक कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अनिल नवगणे यांनी श्रीवर्धन मतदार संघातून आदिती तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ऐन विधान सभा निवडनुकीच्या तोंडावर नवगणे यांनी ठाकरे गटातुन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश करताना नवगणे यांनी ठाकरे गट सोडण्याचे कारण सांगताना ठाकरे गटावर टिका केली. श्रीवर्धनमधून मला उमेदवारी जाहीर केली. निवडणुकीच्या तोंडवर तडजोडी करून श्रीवर्धन मतदार संघ विकण्याचे काम ठाकरे गटाने केले असल्याचा आरोप अनिल नवगणे यांनी केला.

Nashik Police News

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहे. नाशिक शहरातील संवेदनशील परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.

छत्रपती संभाजीनगर - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्रांती चौकात ठिय्या आंदोलन

मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा

MPSC ने परीक्षा पुढे धकलल्याचे नोटिफिकेशन काढल्यापासून 45 दिवसानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी

MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या अ राजपत्रित परीक्षेत PSI, STI, ASO आणि SR या पदांची संख्या वाढवण्यात यावी

पीडीसीसी बँकेत मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल

हिंगोलीच्या पीडीसीसी बँकेत पिक विम्याची रक्कम काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत राडा केल्या प्रकरणी बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे , संजय रघुजी वाघमारे व चांदू रघुजी वाघमारे अशी दोन सख्ख्या भाऊ असलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत दरम्यान बँकेच्या व्यवस्थापकांनी शाखेच्या बाहेर येऊन कर्मचाऱ्यांना सोबत घेत या शेतकऱ्यांना देखील बेदम मारहाण केल्याने आता शेतकरी देखील बँक व्यवस्थापनाच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार आहेत.

कुरनूर धरणातून २५० क्युसेसने पाण्याचा विसर्ग; ३ दरवाजे उघडले

अक्कलकोट तालुक्याची वरददायनी ठरलेल्या कुरनूर धरणातून उन्हाळी हंगामासाठी दुसऱ्या आवर्तनाचे पाणी २५० क्युसेसने सोडण्यात आले आहे.यासाठी ३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.सध्या धरणात २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.यापैकी अंदाजे ८ ते १० टक्के पाणी विसर्गासाठी वापरण्यात येणार आहे.

धरणाखालील एकूण ८ बंधारे या पाण्यावर अवलंबून आहेत.मात्र, कमी साठ्यामुळे सर्व बंधारे भरतील की नाही,याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान,या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना पिण्याचे आणि शेतीसाठी काहीसा दिलासा मिळणार आहे.

संजय राऊतसोडून गेलेले आज दिल्लीत हुजरेगिरी करतात. आज अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा

गेल्या अनेक वर्षापासून बहुप्रत्यक्षित असलेले अखेर अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,एकनाथ शिंदे,दोन्ही उपमुख्यमंत्री,केंद्रीय उड्डाण मंत्री कीजरापू राम मोहन नायडू यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार असून आजपासून अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती विमानसेवेला सुरुवात होणार आहे... अमरावती विमानतळा सोबतच आशिया खंडातील सर्वात मोठे एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे देखील आज लोकार्पण होणार पार पडणार आहे,या विमानतळामुळे अमरावतीच्या विकासाला चालना मिळणार आहे..

विजय वडेट्टीवारनॅशनल हेरॉल्ड ही सरकारी मालमत्ता नाही, भाजप घाबरलेले आहे. दुसऱ्याच्या गुडघ्यावर हे सरकार उभं आहे. राहूल गांधी यांची भिती वाटते. नॅशनल हेरॉल्ड यात कोणताही भ्रष्ट्राचार नाही... राहुल गांधीच्या भीतीपोटी ही कारवाई होत आहे... मात्र भाजपने लक्षात ठेवावे..आज भाजप ची सत्ता आहे उद्या आमची येईल.. जसे पेरेल तसे उगवेल. गृह विभागाच्या मोक्याच्या जागेवर पोलीसांसाठी गृह निर्माण प्रकल्प उभारण्याचा निर्णय विचाराधीन, गृहराज्य मंत्र्यांचे सुतोवाच

राज्यात पोलीसांच्या घरांचा प्रश्न महत्वाचा असून यासंदर्भात गृह विभाग एक निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईसह एमएमआर क्षेत्रात विकासाअभावी पडून असलेल्या गृह विभागाच्या काही भूखंडावर ग्रीह विभागातर्फे गृहनिर्माण विभागाच्या मदतीने घरे बांधण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी दिलेय. गृह विभागाच्याच भूखंडावर सिडको किंवा म्हाडा सारख्या सरकारी यंत्रनेद्वारा हे गृहप्रकल्प उभारले जाऊ शकतात यासाठी वरिष्ठ पातळीवर विचार होणे आवश्यक आहे. पोलिसांना चांगली घरे मिळाली पाहिजेत, त्यांचे राहणीमान उंचावले पाहिजे, यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सुतोवाच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेय.

रथ मिरवणुकीत राडा घालणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर शहरात हनुमान जयंतीच्या दिवशी रथ मिरवणुकीत राडा झाल्याची घटना घडली होती.. ढोल पथकातील काही लोकांनी रथाला सलामी देण्याच्या मुद्द्यावरून आयोजकांसोबत वाद घातले होते.. या प्रकरणात आयोजकांच्या फिर्यादीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश आहे.

जळगाव जिल्हा गाड्ऱ्या गावाजवळ क्षेत्रात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ, खुनाचा संशय

यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गाड्ऱ्या या गावाच्या जवळील वनक्षेत्रात एका अनोळखी सुमारे ६५ वर्षीय वयोगटातील वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. याची माहिती पोलिसांना देताच पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. मृतदेहास पंचनामा करून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मयत महिलेची हत्या झाल्याचा संशय असून तिची ओळख पटलेली नाही. तर मंगळवारी दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक यांचे पथक सातपुड्याच्या दिशेने घटनास्थळी रवाना झाले आहे. तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिका आयुक्तांची हायकोर्टात बिनशर्त माफी

- नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार फहीम खानचे घर बुलडोझरने पाडल्या प्रकरणी नागपूर महानगरपालिका आयुक्तांची हायकोर्टात बिनशर्त माफी

- फहिम खान याचे घर पाडल्या प्रकरणी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी हायकोर्टात शपथपत्र दाखल केले

- मनपाच्या प्रशासकीय अधिकारी, नगररचना विभाग आणि झोपडपट्टी विभागाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची माहिती नसल्याचे शपथपत्रात दावा

- नोव्हेंबर 2024 च्या आपल्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाने बुलडोझर कारवाईवर प्रतिबंध लावला आहे.

- 17 मार्चला नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात स्वयंखान हा कथित सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे...

- पोलिसांनी त्याला अटक केली असून देशद्रोह आणि इतर गुन्हे फहिम खानवर लावण्यात आले आहे.

- मनपाची नोटीस मिळाल्या नंतर फहिम खानची आई मेहरूनिस्सा यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.

- मात्र कोर्टात सुनावणीपूर्वीच मनपाने कारवाई करत स्वयंखान्याचे त्याच्या आईच्या नावावर असलेलं घर बुलडोजर जर कारवाई करत पाडलं होतं

- या प्रकरणी हायकोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांनी कोर्टात माफी मागितली.

- बुलडोजर कारवाई पोलिसांच्या विनंतीवरून मनपाच्या झोपडपट्टी कायद्याअंतर्गत करण्यात आली..

- कोर्टाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन मनपायुक्ताने आपल्या शपथपत्रात दिला आहे.

नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या नेतृत्वात एका पथकाने ही चौकशी सुरू केल्याची माहिती. शिक्षण विभागात झालेल्या या घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी डॉ. पालकर यांनी राज्यातील निवडक शिक्षण अधिकाऱ्यांना पुणे येथे बोलावल्याची माहिती

Pune News Live Updates : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनमध्ये तज्ज्ञांच्या समितीच अहवाल सादर

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयावर आरोप केले जात आहे.तनिषा भिसे यांचा मृत्यू प्रकरणात आत्ता ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून तिन्ही अहवालाची तपासणी करून रात्री उशिरा अहवाल सादर केला आहे.काल दिवसभर पुण्यातील ससून रुग्णालय येथे या तज्ञ समितीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत भिसे यांचा मृत्यूची जबाबदारी नेमकी कोणाची यावर चर्चा करत समितीच्या निष्कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे सुपूर्त केला आहे.आत्ता या प्रकरणी पुढील कारवाईची नेमकी दिशा ठरणार आहे.

जालना जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या वतीने 31 मे पर्यंत शोध मोहीम

जालन्यात अंत्योदय आणि प्राधान्य घटकातील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी पुरवठा विभागाने मोहीम हाती घेतली आहे. 31 मे पर्यंत अंत्योदय आणि प्राधान्य घटकातील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. या मोहिमेत रेशन कार्डधारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी करण्यात येणार असून पुरावा नसल्यास ते रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. धान्य घेणाऱ्या प्रत्येक रेशन कार्डधारकास येणाऱ्या 31 मे पर्यंत रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला रेशन दुकानदाराकडे जमा करावा लागणार आहे. शोध मोहिमेत अर्जासह कागदपत्रे जमा न करणाऱ्या लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येणार आहे..

छत्रपती संभाजीनगर सिटी बसच्या भाड्यात आजपासून २०% टक्के वाढ

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी बसच्या भाड्यात आजपासून २०% टक्के वाढ करण्यात आलीय. सिटी बसच्या तिकीट दरात संभाजीनगर स्मार्ट सिटीने २०१९ नंतर पहिल्यांदाच एकदम २० टक्के वाढ केली आहे. बसचे किमान तिकीट ६ - रुपये असणार आहे. २०१९ मध्ये स्मार्ट सिटीच्या - निधीतून १०० बसची खरेदी केली. सिटी बस सेवा सुरू करताना निश्चित करण्यात आलेल्या प्रवास - भाड्यात २०२२मध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर - तिकीट दरात वाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे आता २० टक्के दरवाढ केली आहे. त्याची - अंमलबजावणी तत्काळ म्हणजे बुधवारपासून (१६ एप्रिल) केली जाणार आहे, असे सिटी बस विभागाचे मुख्य चालान अधिकारी संजय सुपेकर - यांनी सांगितले आहे. रांजणगाव, वेरूळ, फुलंब्री, - जोगेश्वरी या मार्गांवर सिटीबसची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन ते सिडको, स्टेशन - ते सीबीएस या मार्गावरही सिटीबसमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 8 लाख 97 हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभागाकडून यंदा आठ लाख 97 हजार हेक्टर वर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये कापसाची सर्वाधिक लागवड होणार असून 24 लाख 55 हजार कपाशी बियाण्यांचा पाकिटांची आवश्यकता आहे.खरिप हंग्मात बी-बियाणे खताची पुरेशी उपलब्धता राहील याची दक्षता घेण्यात यावे असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आढावा बैठकीत कृषी विभागाला दिले.

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील चालिया मंदिर परिसरात आत्तम अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली, या दुर्घटनेत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे राजकुमार दुसेजा हे जखमी झाले. ही इमारत १९९५ साली उभारण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर ही इमारत सील करण्यात आली असून सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आलंय, मात्र त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. आता ही इमारत रिकामी करून निष्कसनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे इमारतीतील रहिवासी मात्र उघड्यावर आले आहेत.

अनधिकृत वाळू उत्खननासाठी गेलेल्या पोकलेनला सावित्री नदीत जल समाधी

अनधिकृत वाळू उत्खननासाठी सावित्री नदीत गेलेल्या पोकलेनला जलसमाधी मिळाल्याचे समोर आले आहे. हि घटना महाड तालुक्यातील वहूर गाव हद्दीत घडली आहे. मिळालेल्या माहिती नुसार कोणतीही परवानगी नसताना सदर पोकलेन वाळू उत्खननासाठी सावित्री नदी पत्रात उतरवण्यात आला होता. चालकला पाणी आणि नदीतील दगडांचा अंदाज न आल्याने पोकलेन मशिन फसली. नंतर आलेल्या भरतीमुळे पोकलेन पाण्याखाली गेल आणि तांत्रिक बिघाड झाला आणि आता हा पोकलेन नदी बाहेर काढणे हि एक समस्या बनली आहे. दरम्यान लाखो रूपयांच पोकलेन पाण्यात बुडत असल्याने मालका मार्फत बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बहूरच्या तलाठ्यांनी घटना स्थळाला भेट दिली असून पंचनामा देखील केला आहे. मात्र परवानगी नसताना सावित्री नदी पात्रात पोकलेन उतरवल्या प्रकरणी महसुल विभाग कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदेडमध्ये शेतकरी संघटनेने केली महायुतीच्या जाहीरनामाचे होळी

महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात कर्जमाफी व हमीभाव देण्याचा आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं. मात्र आतापर्यंत कर्जमाफीचा निर्णय न झाल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नांदेडच्या कोंडा येथे शेतकऱ्यांनी एकत्रित येत सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे. निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्याची होळी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra News Live Updates : 14 वर्षांनतंर अमरावती विमानतळ वरून विमानसेवेला होणार प्रारंभ

अखेर आज 14 वर्षांनतंर अमरावती विमानतळ वरून विमानसेवेला होणार प्रारंभ

देवेंद्र फडणवीस,केंद्रीय वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू यासह दोन्ही उपमुख्यमंत्री,मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार विमान सेवेचा शुभारंभ... *

सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळावर लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम

अखेर अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली....

या उदघाटन सोहळ्यासाठी 400 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याचा असणार चोख पोलीस बंदोबस्त...

भव्य कार्यक्रमाला 3 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था

72 आसनी विमान अमरावती ते मुंबई व मुंबई ते अमरावती असे आठवड्यातून तीन वेळा असनार

कळंब शहरातील भाजी मंडई रोडवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ सिध्देश्वर शिंगणापूरे यांचे उपोषण

धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे नगर परिषद अंतर्गत बांधण्यात आलेल्या भाजी मंडई रोडवरील दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढावे यासह मन्मथ स्वामी मंदीराच्या सभा मंडपाचे होणारे निकृष्ट बोगस बांधकाम थांबवावे या मागणीसाठी व कळंब नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थ सिध्देश्वर शिंगणापूरे यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे दरम्यान याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

DHULE तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात उडाली खळबळ

शिरपूर शहरालगत असलेल्या करवंदनाका परिसरातील पाटबंधारे कार्यालयाच्या भिंती जवळ रात्री 10 वाजेच्या सुमारास युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, परिसरातील नागरिकांनी तरुणास शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तरुणास मृत घोषित केले, त्यामुळे या तरुणाचा कुनी घातपात तर केला नाही ना याचा संशय व्यक्त केला जात आहे, मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, आज सकाळी त्यावर शवविच्छेदन झाल्यानंतर तरुणाच्या मृत्यू संदर्भात उकल बाहेर येण्याची शक्यता आहे,

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.